घरदेश-विदेशकत्तल करण्यासाठी केली उंटांची अवैध वाहतूक

कत्तल करण्यासाठी केली उंटांची अवैध वाहतूक

Subscribe

राजस्थानहून आणलेल्या उंटांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात औरंगाबाद पोलिसांना यश आले आहे. कत्तलखान्यात घेऊन जाण्यासाठी या उंटांची अवैध वाहतूक केल्याचे समोर आले आहे.

राजस्थानहून आणलेल्या उंटांची अवैध वाहतूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजस्थानहून आणलेले उंट घेऊन हैदराबादला निघालेला ट्रक औरंगाबाद येथे पकडण्यात आला आहे. या ट्रकमध्ये १४ उंट होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती वृत्तसंस्था एएनआयने दिली आहे. उर्वरित उंटांना औरंगाबाद येथील गायींसाठी तयार करण्यात आलेल्या निवाऱ्यात ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

नेमके काय घडले?

राजस्थानहून १४ उंटांना घेऊन ट्रक चालक हैदराबादला निघाला होता. औरंगाबाद पोलिसांना मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार दोन ट्रक चालक उंटांना घेऊन अवैध वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद पोलिसांनी सापळा रचला. त्यानुसार उस्मानाबादजवळ ट्रक पोहोचल्यानंतर त्या ट्रकची पोलिसांनी चौकशी करत तपासणी केली असता त्यांना त्या ट्रकमध्ये उंट आढळले. या ट्रकमध्ये एकूण १४ उंटांपैकी एकाचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

२७ उंटांची केली अवैध वाहतूक

औरंगाबाद पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार दोन ट्रकमधून उंटांची अवैध वाहतूक करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दोन ट्रकमधून ही वाहतूक केली असल्याचे समोर आले आहे. या दोन ट्रकमध्ये एकूण २७ उंट असल्याचे समोर आले आहे. पोलीस दुसऱ्या ट्रकचा शोध घेत आहेत.

का केली उंटांची अवैध वाहतूक

या उंटांना हैदराबादच्या कत्तलखान्यात नेण्यात येणार असल्याची माहिती औरंगाबाद पोलिसांना मिळाली आहे. कत्तलखान्यात घेऊन जाण्यासाठी या उंटांची अवैध वाहतूक केल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -