एसएससी बोर्डाच्या शाळा १७ जूनला सुरू

एसएससी बोर्डाच्या शाळा १७ जूनला सुरू

School

उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर दरवर्षी शाळा १३ जूनला सुरू होतात, परंतु 2019-20 या शैक्षणिक वर्षात एसएससी बोर्डाच्या शाळा चार दिवस उशीरा म्हणजे 17 जूनला सुरू होणार आहेत. तसेच यावर्षी दिवाळीची दीर्घकालीन सुट्टी 21 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

एसएससी बोर्डाच्या राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळ्याची व दिवाळीच्या सुट्टीबाबत सुसूत्रता रहावी म्हणून शिक्षण संचलनालयामार्फत शैक्षणिक वर्षातील सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 1 मेे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात येणार आहे. ही सुट्टी 17 जूनपर्यंत असणार आहे. दरवर्षी साधारणपणे शाळा १३ जूनला सुरू होते, परंतु यावर्षी मात्र १३ जूनला या वर्षी गुरुवार आहे. त्यामुळे त्यादिवशी अर्धा दिवस शाळा, मग शुक्रवारी पूर्ण दिवस पुन्हा शनिवार, रविवार सुट्टी. यापेक्षा थेट १७ जूनला शाळा सुरू करण्याचा निर्णय यावर्षी शिक्षण विभागाने आहे. त्याचप्रमाणे गणेशोत्सव व नाताळ यासारख्या सणांसाठी विद्यार्थ्यांना सुट्ट्या देण्यासाठी उन्हाळी आणि दिवाळी या दीर्घकालीन सुट्ट्या कमी करून त्याचे नियोजन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीकरिता येऊ शकते, परंतु या सुट्ट्या 76 दिवसांपेक्षा अधिक नसाव्यात व कामकाजाचे दिवस 230 होणे अपेक्षित असल्याच्या सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे परिपत्रकाद्वारे सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्‍यांना व मुंबई महापालिकेच्या शिक्षण निरीक्षकांना दिल्या आहेत.

सरकारी, स्थानिक सुट्ट्या, धार्मिक सण व उत्सव विचारात घेऊन सुट्ट्यांचा कालावधी निश्चित करण्यात यावा. यासाठी जून ते मे अखेर असे शैक्षणिक वर्षे विचारात घेऊन प्रत्येक शाळेत किमान 230 दिवस कामकाज चालेल अशा पद्धतीने वार्षिक वेळापत्रक शिक्षणाधिकार्‍यांनी बनवावे, अशा सूचना शिक्षण संचालनालयातर्फे देण्यात आल्या आहेत.

First Published on: April 20, 2019 10:32 PM
Exit mobile version