विद्यार्थ्यांना परराज्यातील शाळांच्या भेटीची संधी

विद्यार्थ्यांना परराज्यातील शाळांच्या भेटीची संधी

समग्र शिक्षा अभियानांतर्गत राष्ट्रीय अविष्कार अभियानामध्ये राज्यातील प्रगत शाळांना परराज्यातील शाळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. ही भेट म्हणजे शाळांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे हे बक्षीस असणार आहे. या उपक्रमासाठी राज्यातील सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. विद्यार्थ्याना परराज्यातील शाळांच्या भेटीसाठी तब्बल १०५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांना इतर राज्यातील विद्यार्थ्यांच्या भेटी व्हाव्यात, तसेच त्यांच्या विचारांची देवाणघेवाण, सांस्कृतिक वृद्धीकरण व आनंददायी शिक्षण प्राप्त व्हावे या उद्देशाने समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना परराज्यातील शाळा भेटीसाठी नेले जाते. यासाठी ज्या शाळा सर्वाधिक प्रगत आहेत तसेच ज्या शाळेतील विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती सर्वोत्तम आहे, अशा शाळांची निवड करण्यात आली आहे. या शाळांना त्यांच्या उत्तम शैक्षणिक कामाबद्दलचे हे बक्षीस असणार आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला तीन हजार रुपये इतका निधी देण्यात येणार आहे. ही योजना सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यासाठी राबविण्यात येणार आहे.

शाळांची, विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची निवड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने होणार असून सर्वोततम शाळेतून १० विद्यार्थी व एका शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांमध्ये ५० टक्के मुले आणि ५० टक्के मुली असाव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या भेटतील परराज्यातील शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणार्‍या शाळा, संस्था, वस्तूसंग्रहालय, प्राणिसंग्रहालय, तारांगण, वारसा इमारती, धरणे आदींचा समावेश असवा असेही या आदेशात राज्याच्या प्रकल्प संचालक वंदना कृष्णा यांनी स्पष्ट केले आहे.

First Published on: October 23, 2019 5:12 AM
Exit mobile version