मंडळांकडून गणेशोत्सवाची जय्यत तयारी; पण पालिकेने मंडप परवानगीचे २६ अर्ज फेटाळले

मंडळांकडून गणेशोत्सवाची जय्यत तयारी; पण पालिकेने मंडप परवानगीचे २६ अर्ज फेटाळले

गेल्या दोन वर्षांपासून कोव्हीडच्या संकटामुळे कोणतेच सण – उत्सव साजरे केले गेले गेले नव्हते. याचा सर्वाधिक फटका हा गणेशोस्तवाला बसला. गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक गणपती सुद्धा अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात आले होते. पण या वर्षी मात्र प्रत्येक सार्वजनिक मंडळांकडून गणेशोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी मोठया मंडपांचे काम सुद्धा लवकरच करण्यात येणार आहेत पण त्याच यासंदर्भातील परवानगी ही मुंबई महापालिकेकडून नाकारण्यात आली आहे. मंडप बांधण्यासाठी आवश्यक असणारी परवानगी मागण्यासाठी पालिकेकडे काही अर्ज आले होते त्यातील २६ पालिकेकडून नाकारण्यात आले आहते.

हे ही वाचा –  कोस्टल रोडच्या कामाला वेग, ५८ टक्के काम पूर्ण

यंदा गणेशोत्सवासाठी आवश्यक मंडपाची परवानगी मिळविण्यासाठी मुंबई महापालिकेकडे आतापर्यंत विविध गणेशोत्सव मंडळांकडून ३७३ अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र कागदपत्रे व अन्य बाबींची पूर्तता करणाऱ्या ११२ अर्जांनाच परवानगी देण्यात आली आहे. ज्या मंडळांची कागदपत्रे, अन्य बाबी सादर करणे प्रलंबित आहे त्यांचे अर्ज परवानगीसाठी रोखण्यात आले आहेत. मुंबईत गेल्या २०२० पासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याने दोन वर्षे गणेशोत्सव व इतर सण, उत्सव साजरे करण्यास सरकारने बंदी घातली होती. मात्र आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने सरकार व पालिका प्रशासनाने गणेशोत्सव कोरोना नियमांचे पालन करून साजरा करण्यास परवानगी दिली आहे.

हे ही वाचा – मुंबई किनारी रस्ता प्रकल्प ठरतोय मरिन ड्राइव्हवरील इमारतींसाठी धोकादायक


त्यामुळे गणेशोत्सव मंडळे काहीशा जोशात आहेत. तसेच, मुर्तीकारांमध्येही उल्हासाचे वातावरण आहे. मात्र गणेशोत्सवात मंडप घालण्यासाठी पालिकेची मंजुरी आवश्यक असते.मात्र त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. ज्या मंडळांनी या कागदपत्रांची पूर्तता केली व ज्या मंडळांना गेल्या वर्षीपर्यन्त रितसर परवानगी देण्यात येते, अशा मंडळांना दरवर्षी आवश्यक परवानगी देण्यात येते. गणेशोत्सवासाठी बाजारात गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. मुंबई महापालिकेकडे संपूर्ण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांकडून आतापर्यंत एकूण ३७३ अर्ज प्राप्त झाले. त्यामध्ये ३५ अर्ज हे दुबार अर्ज आहेत. तर ३३८ अर्ज हे सध्या तपासणी प्रक्रियेत आहेत. मुंबई महापालिकेकडून आतापर्यंत ११२ अर्जांना परवानगी देण्यात आली आहे. तर २०० अर्ज हे विविध पातळीवर तपासणीसाठी आहेत. महापालिकेकडून २६ अर्ज फेटाळण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेचे उपायुक्त हर्षद काळे यांनी दिली.

First Published on: July 20, 2022 9:39 PM
Exit mobile version