गृहपाठ न केल्याने खासगी शिक्षिकेची विद्यार्थीनीला मारहाण

गृहपाठ न केल्याने खासगी शिक्षिकेची विद्यार्थीनीला मारहाण

संग्रहित छायाचित्र

अभ्यास न केल्याने चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थींनीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना नेरुळमध्ये घडल्याचे समोर आले आहे. साक्षी शिनलकर () असे या चिमुकलीचे नाव आहे. गृहपाठ न केल्याने या चिमुकलीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात खासगी शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, कारवाईसाठी पोलीस चालढकल करत असल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.

नेमके काय घडले?

नेरुळ सेक्टर १० येथे शिनलकर हे कुटुंब राहत असून त्यांची मुलगी साक्षी ही नेरुळ सेक्टर ८ मध्ये एका घरगुती क्लासला जाते. ती नेहमीप्रमाणे सोमवारी शिकवणीसाठी शिक्षिकेकडे गेली होती. मात्र, तिला दिलेला गृहपाठ न केल्याचे शिक्षिकेने पाहिले. गृहपाठ न केल्यामुळे शिक्षिका गोम्स यांनी साक्षीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत चिमुरडीच्या संपूर्ण शरीरावर वळ, काळे निळे डाग पडले आहेत. हा प्रकार साक्षीच्या घराच्या मंडळींच्या लक्षात आल्यानंतर तिच्या पालकांनी नेरुळ पोलिसात धाव घेत गोम्स यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल करुन सुद्धा शिक्षिकेला अटक करण्यात पोलीस चालढकल करत असल्याचा आरोप साक्षीचे वडील दत्तू शिनलकर यांनी केला आहे. चौकशीच्या बहाण्याने आपल्यालाच सुमारे तीन तास पोलीस ठाण्यात बसून ठेवल्याचा आरोप साक्षीच्या वडीलांनी केला आहे.


हेही वाचा – शिक्षकच उठले विद्यार्थ्यांच्या जिवावर; पहिलीतील विद्यार्थ्याला जबर मारहाण


 

First Published on: July 10, 2019 8:52 AM
Exit mobile version