घरमहाराष्ट्रशिक्षकच उठले विद्यार्थ्यांच्या जिवावर; पहिलीतील विद्यार्थ्याला जबर मारहाण

शिक्षकच उठले विद्यार्थ्यांच्या जिवावर; पहिलीतील विद्यार्थ्याला जबर मारहाण

Subscribe

पुण्यातील राजगुरूनगर येथील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिलीच्या इयत्तेत शिकणाऱ्याला विद्यार्थ्यांने बेंच वाजवल्याने विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शिक्षक लक्ष्मण कडलग याच्यावर विरोधात खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पुण्यातील राजगुरूनगर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समीर शैलेश रणदिवे (६) असे या चिमुकल्याचे नाव आहे. शिक्षक वर्गाबाहेर गेल्याने वर्गातील विद्यार्थ्यांनी बेंच वाजवण्यास सुरुवात केली. वर्गातील विद्यार्थी जोरजोरात बेंच वाजवत असल्याचे पाहिले असता शिक्षकांना राग अनावर झाल्याने त्यांनी विद्यार्थ्यांना छडीने मारहाण केली. शिक्षकांने छडीने मुलाच्या पाठीवर वळ उठेपर्यंत जबर मारहाण केली. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवर अक्षरश: वळ उठले आहेत. याप्रकरणी शिक्षक लक्ष्मण कडलग याच्यावर विरोधात मुलाच्या आईने खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

का झाली चिमुकल्याला मारहाण

राजगुरुनगर येथील जिल्हा परिषदेची शाळा शनिवारी नेहमीप्रमाणे सकाळी भरली. दरम्यान येथील शाळेचे शिक्षक आणि काही विद्यार्थी वर्गाबाहेर गेले. त्यावेळी संबंधित विद्यार्थ्यांनी वर्गातील बेंच वाजवण्यास सुरुवात केली. विद्यार्थी बेंच वाजवत असल्याचे पाहिल्याने शिक्षक लक्ष्मण कडलग यांना राग आला. त्यांनी काठीने मुलाच्या पाठीवर वळ उठेपर्यंत जबर मारहाण केली. घरी आल्यावर मुलाने पालकांना संबंधित घटना सांगितली. पालकांनी मुलाला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.

- Advertisement -

पंचायत समितीच्या हाक्केच्या अंतरावर शाळा

खेड पंचायत समितीच्यासमोर असलेल्या या शाळेत अशी घटना घडत असेल तर ग्रामीण भागातील आणि लांबच्या दुर्गम भागातील विद्यार्थी सुरक्षित आहेत का?रोजंदारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील लहान मुलावर ओढवलेल्या या प्रकाराने शहरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. चिमुकल्या मुलाला निर्धयी पद्धतीने मारहाण होऊनही पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने त्याविषयी कोणतीही दखल घेतली नसल्याने चिडलेल्या पालकांनी राजगुरूनगर पोलिसात शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांना घरातील वातावरणाप्रमाणे खेळीमेळीच्या वातवरणात शिक्षक दिले पाहिजे. तशा सुचनाही शिक्षकांना दिल्या जातात मात्र राजगुरुनगर येथील शाळा क्र १ मध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेची सखोल चौकशी करुन कारवाई करणार आहे.  – संजय नाईकडे, गटशिक्षण आधिकारी…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -