ठाकरे सरकार करेल ‘तेच नियम तेच कायदे’, आशिष शेलारांची राज्य सरकारवर बोचरी टीका

ठाकरे सरकार करेल ‘तेच नियम तेच कायदे’, आशिष शेलारांची राज्य सरकारवर बोचरी टीका

ठाकरे सरकार करेल 'तेच नियम तेच कायदे', आशिष शेलारांची राज्य सरकारवर बोचरी टीका

राज्यात येत्या १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार जयंती आहे. परंतु कोरोनाचे संकट असल्यामुळे शिवजयंती साजरी करण्यावर राज्य सरकारकडून मार्गदर्शक यादी जाहीर करुन काही निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे शिवभक्तांनी आणि विरोधकांनी राज्य सरकारच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात अली असूनही राज्य सरकारकडून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत. राज्य सरकारने पहिले नियम जारी करुन ५० लोकांच्या उपस्थितीची परवानगी दिली होती. यानंतर मुंबईतील कोरोना रुग्णांच्या आकड्यात वाढ झाल्याने पुन्हा मार्गदर्शक यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये १०० जणांची उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.

आशिष शेलारांची बोचरी टीका

गृहविभागाकडून पुन्हा मार्गदर्शक यादी जाहीर केल्याने भाजप, मनसे आणि शिवभक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावरुन भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, भायखाळ्यात पेंग्विन पाहायला १६ फेब्रुवारीपासून यायचं हं सरकारचं असं आमंत्रण आलय बर का पण खबरदार जर जयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला जमलात तर असे सरकारचे आदेश पण त्यामुळे सांभाळा! अजब वाटले तरी नियम पाळा! ठाकरे सरकार करेल तेच नियम आणि तेच कायदे अशी खरपूस टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

राम कदमांचा ठाकरे सरकारवर घणाघात

भाजप आमदार राम कदम यांनी देखील राज्य सरकारच्या निर्णयावर खरपूस टीका केली आहे. राम कदम यांनी ट्विट करत म्हटले आहे की, शिवजयंती साजरी करण्यासाठी आम्ही आंदोलन करणार असल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले त्यामुळेच राज्य सरकारला झुकावे लागले असल्याचे राम कदम यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने शिवजयंती साजरी करण्यासाठी १०० लोकांची उपस्थितीची परवानगी दिली आहे. परंतु सरकारच्या कोणत्याही नियमांना स्वीकान न करता शिवजयंती मोठ्या धामधूमीत करणार असल्याचे राम कदम यांनी म्हटले आहे.

First Published on: February 12, 2021 3:44 PM
Exit mobile version