ठाणे शहरात अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो

ठाणे शहरात अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो

'ठाणे अंतर्गत मेट्रो'ला राज्य मंत्रिमंडळात मंजुरी

राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये तब्बल २२ निर्णय घेण्यात आले आहेत. एकाच बैठकीत २२ निर्णय घेणारी ही पहिलीच बैठक ठरली आहे. यामध्ये ठाणे शहराच्या हितासाठी निर्णय घेण्यात आले आहे. ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी अंतर्गत मेट्रो रेल्वे प्रकल्पाची मागणी करण्यात आली होती. ५ मार्चला झालेल्या बैठकीमध्ये अंतर्गत मेट्रो रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणीस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. १० हजार कोटी रूपयांचा ठाणे अंतर्गत मेट्रो हा प्रकल्प आहे. ठाणे महापालिका संपूर्ण ठाणे शहरात वर्तुळाकार मेट्रो बांधणार आहेत. तसेच त्या मेट्रोला ठाणे अंतर्गत मेट्रो असे नाव देण्यात आले आहे.

‘ठाणे अंतर्गत मेट्रो’ प्रकल्प मंजुर

ठाणे शहरातील वाढती गर्दी, प्रवासा संबंधीतील समस्या तसेच परिसरातील वाहतुकीची वाढती गरज भागवण्यासाठी ही मेट्रोची सोय करण्यात आली आहे. वाहतुक ही जलद होण्यासाठी ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रणालीची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेचा मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प मंजुर करण्यात आला. राज्यसरकारकडूनही या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मार्फत या प्रकल्पातची अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच, महत्त्वपूर्ण नागरी प्रकल्प म्हणून घोषित करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. ठाणे अंतर्गत मेट्रोचा पहिला टप्पा नवीन ठाणे ते ठाणे दरम्यान २९ किलोमीटरचा असणार आहे. तर हा प्रवास १० रूपये खर्चाचा असणार आहे. यामध्ये २० उन्नत, तर दोन भुयारी अशी २२ स्थानके असणार आहेत.

ठाणे अंतर्गत मेट्रोची स्थानके

First Published on: March 6, 2019 11:29 AM
Exit mobile version