घरमुंबई'मेट्रो - ४ प्रकल्पा'साठी कोट्यवधींचे आर्थिक सहाय्य

‘मेट्रो – ४ प्रकल्पा’साठी कोट्यवधींचे आर्थिक सहाय्य

Subscribe

मेट्रो ४ प्रकल्पाला एआयआयबी आर्थिक सहाय्य करणार आहे. यासंबंधीची घोषणा या बँकेचे उपध्याक्ष डॅनी एलेक्झांडर यांनी पत्रकार परिषदेत केली. मेट्रो ४ ची मार्गिका इतर मेट्रो प्रकल्पांना जोडली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखीनच सुखकर होईल.

वडाळा – घाटकोपर – मुलुंड – ठाणे – कासारवडवली या मेट्रो ४ प्रकल्पासाठी ‘एशियन इन्फ्रास्टक्चर इन्व्हेस्टमेंट बॅंक’ (एआयआयबी) मार्फत आर्थिक सहाय्य मिळणार आहे. एआयआयबीचे उपाध्यक्ष डॅनी एलेक्झांडर यांनी आज पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती दिली. वडाळा – कासारवडवली या प्रकल्पासाठी ४७५ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट (एमयुटीपी) अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे, अशी माहिती अर्थ विभागाचे सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी दिली. एआआयबीच्या तिसऱ्या वार्षिक परिषदेच्या निमित्ताने ते बोलत होते. मुंबई व्यतिरिक्त अमरावतीच्या स्मार्ट प्रकल्पासाठी देखील एआयआयबीकडून आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे.

संपूर्ण मार्गिका एलिवेटेड 

mumbai-metro
मेट्रो एलिवेटेड मार्ग (प्रातिनिधिक चित्र)

वडाळ्याऐवजी जीपीओपर्यंतही हा प्रकल्प जोडण्याचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) मानस आहे. वडाळा ते कासारवडवली हे अंतर ३२.३ किलोमीटर आहे. तर ही संपूर्ण मार्गिका एलिवेटेड (उन्नत) स्वरूपाची असेल. या मार्गिकेदरम्यान ३२ स्थानके असतील. मेट्रो प्रकल्पामुळे हे अंतर ३० पार करणे शक्य होणार आहे. या मार्गावर ८.७ लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. आगामी काळात दीड लाख प्रवाशांची भर या मार्गावर पडेल.

- Advertisement -

मेट्रो कनेक्ट

मेट्रो ४ ही मार्गिका पूर्व – द्रुतगती महामार्ग, मध्य रेल्वे, मुंबई मोनोरेल, डी. एन. नगर ते मंडाले मेट्रो – २ बी, वडाळा ते जीपीओ मेट्रो – ८, ठाणे ते कल्याण मेट्रो – ५, स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो -६ या प्रकल्पांना जोडण्यासाठी उपयुक्त ठरेल.

२०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक

नॅशनल इन्फ्रास्टक्चर इन्व्हेस्टमेंट फंडसाठी एआयआयबीमार्फत २०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार आहे. बंदर, टर्मिनल, वाहतूक आणि लॉजिस्टिक या क्षेत्रात ही गुंतवणूक करण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -