ठाणे शहरातील नाल्यावरील घरांना नोटीसा

ठाणे शहरातील नाल्यावरील घरांना नोटीसा

एका शासन निर्णयाने महापालिकेची ३६०० पदे रिक्त

अनधिकृ बांधकामांची बहुसंख्या असणाऱ्या ठाणे शहरात अनेक घरे चक्क नाल्यावर असून पावसाळ्यात अशा ठिकाणी होणारी संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन येथील रहिवाशांना त्वरित नोटीसा देण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शनिवारी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिले आहेत. त्याचबरोबर शहरातील नाले सफाई, रस्त्यांच्या बाजूला असलेल्या गटारांच्या सफाईची कामे कोणत्याही परिस्थितीत २ जूनपर्यंत पूर्ण करावीत, असे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर रस्ते आणि उड्डाण पूल याठिकाणी उभी करण्यात आलेली बेवारस वाहने इतरत्र हलवावीत त्याचप्रमाणे पावसाळ्याआधी रस्त्यांवरील चरांचे पुनर्पृष्ठीकरण करण्यात यावे, जेणेकरून पावसाळ्यामध्ये कुठलीही दुर्घटना अथवा जीवितहानी होणार नाही, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. महापालिका आयुक्तांनी महापालिकेचे सर्व अधिकारी, मेट्रो, महावितरण, महानगर गॅस, एमएमआरडीए आदी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक नागरी संशोधन केंद्रात घेतली होती. यावेळी त्यांनी रस्त्यांवरील खड्डे, सेवा रस्त्यांवरील खड्डे बुजवितानाच या रस्त्यांवरील तसेच उड्डाणपुलाखालील सर्व बेवारस वाहने इतरत्र हलविण्याबाबत सहाय्यक आयुक्तांना सूचीत केले. याबाबत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिला आहे.

अनधिकृत पार्किंग हटवावे

ज्या रस्त्यांवर टेंपो, रिक्षांचे अनधिकृत पार्किंग तात्काळ बंद करावेत, असे वाहतूक पोलिसांना सांगितले आहे. शहराच्या ज्या सखल भागात जिथे कायम पाणी साचते, तिथे विशेष दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितले आहे.

‘मेट्रो’च्या कामांकडे विशेष लक्ष

शहरात गेल्या काही महिन्यांपासून मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यासांठी रस्त्यात ठिकठिकाणी अडथळे उभारण्यात आले आहेत. मात्र त्याठिकाणी पाणी अडणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. त्या ठिकाणी पडणारे डेब्रीज तात्काळ उचलावे. तसेच पावसाळ्याच्या काळात याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावता येईल का याची पाहणी करण्याच्या सूचना त्यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

खड्ड्यांचा बंदोबस्त

पावसाळ्यात रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडून वाहतूक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे यंदा पडणारे खड्डे बुझविण्यासाठी आधीच एन्जसी निश्चित करण्यास सांगण्यात आले आहे.

आरोग्याची काळजी

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात स्वाईन फ्लू कक्ष सुरू करण्यात येणार आहे. तसेच तिथे आवश्यक तो औषध साठा उपलब्ध करून दिला जाईल. त्याचबरोबर इमारत बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आवश्यक ती फवारणी करण्याबाबत विकासकांना पत्र देण्यात येईल, आवश्यक ठिकाणी वृक्षांची छाटणी करणे, छाटलेल्या फांद्याा वेळेत उचलणे आदी कामाचे नियोजन करण्याच्या सूचना देखील त्यांनी या बैठकीत दिल्या आहेत.


वाचा – कल्याण डोंंबिवलीतील अनधिकृत बांधकामाला जबाबदार कोण ?

वाचा – कल्याण डोंबिवली अनधिकृत बांधकामाची स्मार्ट सिटी


 

First Published on: May 25, 2019 7:15 PM
Exit mobile version