‘ठाणे वर्षा मॅरेथॉन’ वादाच्या भोवऱ्यात?

‘ठाणे वर्षा मॅरेथॉन’ वादाच्या भोवऱ्यात?

भाजपाकडून निवडणूक आयोगाकडे  प्रभागरचना रद्द करण्याची मागणी

कोल्हापूर, सांगली सह कोकण परिसरात अतिवृष्टीमुळे लाखो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. सर्वच राजकीय पक्ष व संघटनांकडून पूरग्रस्तांच्या मदतीचा ओघ सुरू आहे. त्यामुळे ठाणे वर्षा मॅरेथॉन रद्द करून त्याचा खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात यावा, अशी मागणी भाजप व मनसेने केली आहे. मात्र अवघ्या ५ दिवसांवर मॅरेथॉन आली असून, सर्व तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे शिवसेना मॅरेथॉन रद्द करण्याच्या भूमिकेत नाही. त्यामुळे ठाणे वर्षा मॅरेथॉन वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


हेही वाचा – दिवा, मुंब्रा, कळव्यामधील पूरग्रस्तांनाही मुख्यमंत्र्यांची मदत


शिवसेना-भाजपमध्ये मतभेद

ठाणे महापालिकेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारी ठाणे वर्षा मॅरेथॉन यंदा रविवार दि. १८ ऑगस्ट रोजी होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजवणे आदी रस्त्याची कामे पूर्ण झाली आहे. मॅरेथॉनची तयारी पूर्ण झाली आहे. मॅरेथॉनवर सुमारे ७५ लाखाच्या आसपास खर्च होत असतो. मात्र भाजपचे गटनेते नारायण पवार आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी मॅरेथॉन रद्द करण्याची मागणी महापौरांकडे केली आहे. एकीकडे महाराष्ट्रात पूरपरिस्थितीमुळे लाखो कुटुंबांचे संसार उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे मॅरेथॉनवर होणारा लाखो रुपये खर्च पूरग्रस्त नागरिकांना देण्यात यावा, अशी त्यांची मागणी आहे. एकीकडे पूरपरिस्थिती असताना दुसरीकडे स्पर्धा घेतल्यास पालिकेच्या विरोधात असंतोष निर्माण होईल. त्यामुळे ही स्पर्धा रद्द करावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे. मात्र मॅरेथॉनची सगळी तयारी पूर्ण झाल्याने स्पर्धा रद्द करता येणार नाही, असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र भाजप आणि मनसेच्या मागणीमुळे शिवसेना कोंडीत सापडली आहे. त्यामुळे मॅरेथॉनवर रद्द होणार की नाही? यावर शिवसेना काय निर्णय घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

First Published on: August 13, 2019 6:43 PM
Exit mobile version