उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या महिलेचा मृतदेह सापडला हाजीअलीच्या समुद्रात

उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या महिलेचा मृतदेह सापडला हाजीअलीच्या समुद्रात

उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या महिलेचा मृतदेह सापडला हाजीअलीच्या समुद्रात

मुंबईतील घाटकोपरमधील असल्फा येथील मॅनहोलमध्ये पडलेल्या महिलेचा मृतदेह हाजिअलीच्या समुद्र किनारी आढळला असल्याचे समोर आले आहे. शनिवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस असल्यामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. याच दरम्यान साचलेल्या पाण्यातून जात असताना शीतल भानुशाली उघड्या मॅनहोलमध्ये पडल्या. त्याच ठिकाणी त्याच्या हातातली पिवळी सापडल्याने शीतल भानुशाली मॅनहोलमध्ये पडल्याची माहिती मिळाली होती. मग त्यानंतर त्यांचा शोध सुरू झाला. आज अखेर शितल भानुशाली यांचा मृतदेह हाजीअलीच्या समुद्र किनारी आढळला आहे.

नक्की काय घडले?

घाटकोपर येथे राहणाऱ्या शीतल भानुशाली दळण आणण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. नेहमी जाणाऱ्या रस्त्याने पाणी साचल्याने त्यांनी दुसऱ्या रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला. त्याच रस्त्याने जात असताना उघड्या मॅनहोलमध्ये पडून त्या वाहून गेल्या. आज त्यांचा मृतदेह हाजीआलीच्या समुद्र किनारी आढळला आहे.

मुंबईत पावसाळ्यात अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे महापालिकेकडून सावधगिरी बाळगण्याची सूचना नेहमी दिल्या जातात. दरम्यान मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने पाणी साचते. त्यामुळे मॅनहोल उघडे करावे लागते, जेणेकरून साचलेले पाण्याला वाट मिळते. पण या उघड्या मॅनहोलमध्ये पडून काही जण वाहून गेल्याचा घटना आपण पाहिल्या आहेत. २०१७मध्ये मुसळधार पावसात बॉम्बे हॉस्पिटलमधील पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर गायब झाले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह वरळीच्या समुद्र किनारी आढळला होता.


हेही वाचा – धक्कादायक! PFच्या पैशांसाठी दोन मुलांनी आईला जाळण्याचा केला प्रयत्न


 

First Published on: October 5, 2020 12:49 PM
Exit mobile version