धक्कादायक! दररोज ५ रुग्णांना अँजिओप्लास्टीची गरज!

धक्कादायक! दररोज ५ रुग्णांना अँजिओप्लास्टीची गरज!

धक्कादायक! दररोज ५ रुग्णांना अँजिओप्लास्टीची गरज!

शरीरातील सर्व अवयवांमध्ये रक्तवाहिन्या पसरल्या आहेत. त्या रक्तवाहिन्यांमध्ये जर गुठळी झाली की त्या अवयवाला रक्त पुरवठा होत नाही. त्यामुळे, अनेकदा हार्ट अटॅक येतो. शिवाय, त्यातून ब्रेन हेमरेजची समस्या ही होते. साधारणपणे रक्तवाहिन्या म्हटलं की हृदयाचा आजार झाला असं म्हटलं जातं. पण, फक्त हृदय नाही तर रक्तवाहिन्या संपूर्ण शरीरात पसरलेल्या आहेत. या रक्तवाहिन्यांचं वेगवेगळं काम आहे, तसेच त्यांचे आजारही वेगवेगळे आहेत. ज्यांचं प्रमाण सध्या वाढताना दिसत आहे. मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी झाली की ब्रेनहेमरेज होतो. तर, हृदयात गुठळी झाली की हृदयाचे विकार होतात. असेच काही आणखी ही आजार आहेत जे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी झाली की होतात. जसे की यकृताचा कॅन्सर, पक्षाघात, ब्रेन हेमरेज आणि हार्टअटॅक.

निला आणि रोहिनी; रक्तवाहिन्यांचे दोन प्रकार

हृदय हे मानवी शरीराचं केंद्र आहे. जिथून सर्व रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. ज्यात निला आणि रोहीनी अशा दोन रक्तवाहिन्यांचा समावेश असतो. निला हृदयाकडे रक्तपुरवठा करतात आणि रोहीनी रक्तवाहिनी हृदयाकडून इतर ठिकाणी शरीरात जाते. रक्तवाहिनी जेव्हा आकुंचन पावते, तेव्हा त्यातून त्या अवयवाला रक्तपुरवठा होत नाही. आपल्या शरीरातील अवयव फुगीर आणि ट्यूब आकाराचे आहेत. यांचे देखील आजार उद्भवतात. ज्याचं प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढलं असल्याचं दिसून येत आहे. ज्यावेळेस रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी तयार होते, त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टर अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला देतात. त्यातून रुग्णाचा रक्तपुरवठा पूर्ववत आणण्यास मदत होते.

३० वर्षात ३० हजार रुग्ण 

केईएम हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन वर्षात ३ हजार ५०० रुग्णांवर रक्तवाहिन्यांच्या आजारांवर उपचार करण्यात आले आहेत. तर, गेल्या ३० वर्षात ३० हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पण, हे प्रमाण आता वाढतं असून पुढच्या दहा वर्षात ३० हजार रुग्णांची अँजिओप्लास्टी केली जाऊ शकते, अशी भीती केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता आणि क्ष-किरण विभाग प्रमुख तसंच रेडिओलॉजिस्ट डॉ. हेमंत देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

ज्या रुग्णांना हृदयाचा अटॅक आला असेल तर त्यांना पायाचं गँगरीन आणि पक्षाघात होण्याची शक्यता असते. तसंच, ज्यांना पायांचं गँगरीन झालं असेल त्यांना हृदयाचा अटॅक येऊ शकतो. तसंच, ज्यांना पॅरालिसीसचा अटॅक आळेला असतो त्यांना हृदयाचा झटका येऊ शकतो. या सर्वांना रक्तदाब, डायबिटीस, आनुवांशिक किंवा कोलेस्ट्रॉल वाढणे, तळलेले खाणे आणि व्यायामाचा अभाव, अजिबात हालचाल न करणे ही सर्व कारणं आहेत. अँजिओप्लास्टीसाठी दिवसाला किमान ५ रुग्ण दाखल होतात. तसंच, ब्रेन हॅमरेजचे किमान २ रुग्ण येतात, असे वर्षाला ४०० रुग्ण दाखल होतात. त्यातील १०० रुग्णांना ज्यांना कॉईलिंग करुन उपचार दिले जातात. पक्षाघात आलेला रुग्ण जर सहा तासांच्या आत हॉस्पिटलमध्ये दाखल झाला तर त्याचा रक्तदाब पूर्ववत आणता येतो. असे रक्तवाहिन्यांचे आजार झालेले सर्वात जास्त रुग्ण हे केईएममध्ये येतात.  
– डॉ. हेमंत देशमुख, अधिष्ठाता आणि रेडिओलॉजिस्ट विभाग प्रमुख केईएम हॉस्पिटल

‘हे’ आहेत रक्तवाहिन्यांचे आजार

कशी केली जाते सर्जरी ?

रक्तवाहिन्यांची जेव्हा गुठळी होते तेव्हा त्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्वचेतून शरीरात प्रवेश केला जातो. पण, कुठल्याही प्रकारची कि होल सर्जरी म्हणजेच चिरफाड न करता केलेली शस्त्रक्रिया ज्याला ‘इंटरव्हेशनल सर्जरी’ असं म्हणतात.

First Published on: January 10, 2019 6:00 AM
Exit mobile version