शॉर्टकट मारणारे 46 एसटीचे चालक-वाहक निलंबित

शॉर्टकट मारणारे 46 एसटीचे चालक-वाहक निलंबित

एसटी बस

एसटी बस थांबा वगळून शॉर्टकट मारत उड्डाणपुलावरून एसटी घेऊन जाणे एसटी महामंडळाच्या चालक-वाहकांना चांगलेच महागात पडले आहे. गेल्या सहा महिन्यांत एसटीच्या तब्बल ४६ चालक वाहकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आले आहे.यात रायगड व मुंबई विभागातील चालक-वाहकांचा समावेश आहे. या कारवाईमुळे एसटी महामंडळात खळबळ उडाली आहेत.

एसटीचे चालक बस थांबा वगळून शॉर्टकट म्हणून उड्डाणपुलाचा वापर करून पुढे रवाना होतात. त्यामुळे प्रवासी एसटीची तासनतास वाट पाहत उभे राहतात. मुंबईतून जाताना व येताना नेरुळ, खारघर, वाशी, कळंबोलीसह अन्य दोन ठिकाणी असलेले बस थांबे वगळून या भागातील उड्डाणपुलावरूनच चालक-वाहक आपली एसटी नेतात. याविरोधात एसटीकडे मोठ्या प्रमाणात तक्रारीही येत आहेत. त्याविरोधात कारवाईचे पाऊल उचलण्यात येत असून रायगड विभागातील तब्बल ४० आणि मुंबई विभागातील सहा चालक-वाहकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

रायगड विभागाच्या अखत्यारित येणार्‍या मुंबई ते श्रीवर्धन ते मुंबई, अलिबाग, मुरुड, महाड, तर मुंबई विभागातील मुंबई ते पैठण, मुंबई ते पुणे यासह अन्य मार्गांचा समावेश असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. यामार्गावरुन जाताना चालक थांबा न घेताच उड्डाणपुलावरुन जात आहे. या कारवाईची धार आणखी तीव्र केली जाणार आहे. १४ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत पितृपंधरवडा सुरू होता.

या काळात एसटी महामंडळाची प्रवासी संख्या व उत्पन्न कमी होत असते. प्रवासी संख्या वाढावी या कालावधीत विविध प्रवासीभिमुख पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. त्यामध्येही मार्ग तपासणी पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे.

First Published on: October 9, 2019 5:13 AM
Exit mobile version