धावत्या रिक्षातून महिलेचे मंगळसूत्र घेऊन चोर पसार

धावत्या रिक्षातून महिलेचे मंगळसूत्र घेऊन चोर पसार

उल्हासनगर येथील एका रिक्षामधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचत पोबारा केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. रिक्षामधून एक महिला आपल्या पती आणि नातेवाईकांसोबत घराच्या दिशेने जात होते. त्या दरम्यान, स्पीड ब्रेकर आल्याने रिक्षाचा देखील स्पीड कमी झाला. याचाच फायदा घेत दुचाकीवरुन येणाऱ्या दोन इसमांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचत धूम ठोकली. याप्रकरणी दोन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

अंबरनाथ तालुक्यातील नेवाळीपाडा या गावात नीता सुरेश उबाळे (२८) महिला तिच्या कुटुंबासह राहत आहे. शनिवारी त्या आपल्या कुटुंबासोबत रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास पती आणि इतर नातेवाईकांसह रिक्षामध्ये बसून घराकडे जात असताना नेवाळी गावाजवळ स्पीड ब्रेकरजवळ रिक्षाचा वेग कमी झाला. याच संधीचा फायदा घेत मोटारसायकल वरून येणाऱ्या दोन अज्ञात इसमाने रिक्षात बसलेल्या नीताच्या गळ्यातील सवा लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र खेचत घटनास्थळावरुन पळ काढला. नीताच्या म्हणण्यानुसार; दोन्ही आरोपींनी काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते आणि त्या आरोपींचे वय २० ते २५ वय असावे, असा अंदाज व्यक्त केला आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वाचा – लोकलमधून मंगळसूत्र पळवणारी महिला गजाआड

वाचा – पोलीस उपनिरीक्षकाचीच दुचाकी चोरीला!


 

First Published on: March 10, 2019 5:04 PM
Exit mobile version