घरमुंबईपोलीस उपनिरीक्षकाचीच दुचाकी चोरीला !

पोलीस उपनिरीक्षकाचीच दुचाकी चोरीला !

Subscribe

पोलीस चौकीमागूनच दुचाकीची चोरी

अंबरनाथमधील एका पोलीस उपनिरीक्षकाचीच मोटारसायकल चोरीला गेली. विशेष म्हणजे पोलीस चौकीच्या मागे ही मोटारसायकल पार्क करून ठेवली असताना हा प्रकार घडला. या चोरीमुळे चोरट्यांनी पोलिसांना थेट आव्हान दिल्यासारखी परिस्थिती असून, चोरट्यांच्या धाडसाची चर्चा या भागातील नागरिकांमध्ये रंगली आहे.

अंबरनाथ पूर्वेकडील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अविनाश नानासाहेब गायकवाड (31) यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. 31 ऑक्टोबर 2018 रोजी गायकवाड हे आनंदनगर एमआयडीसी पोलीस चौकीजवळ बंदोबस्तासाठी गेले असता त्यांनी चौकीच्या मागे आपली नवीन सिबी शाईन मोटारसायकल पार्क करून ठेवली होती . मात्र, पोलिसांची नजर चुकवून एका अज्ञात चोरट्याने ही मोटारसायकल चोरी केली. पोलिसांनी या मोटारसायकलचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. आपल्या खबर्‍यांनादेखील कामाला लावले. मात्र, या मोटारसायकलचा शोध लागला नाही.

- Advertisement -

शेवटी पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनीच फिर्यादी म्हणून बुधवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.याबाबत शिवाजी पोलीस ठाण्यात तक्रार विलंबाने करण्याचे कारण विचारले तेव्हा पोलिसांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. याबाबत परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे यांना विचारले असता ते म्हणाले की, या घटनेबाबत मला अद्याप माहीत नाही. तर, परिमंडळ 4 क्षेत्रात असलेल्या उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांच्या चोर्‍या होत आहेत. आता पोलीस उपनिरीक्षकाची मोटारसायकल पोलीस चौकीजवळून चोरी व्हायला लागल्या आहेत. याचा अर्थ चोरांना कसलेच भय राहिलेले नाही. हे या घटनेमुळे सिद्ध झाले आहे .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -