घरमुंबईरिक्षाचालकाने परत केली प्रवाशाची पर्स

रिक्षाचालकाने परत केली प्रवाशाची पर्स

Subscribe

नवी मुंबईतील एका प्रामाणिक रिक्षा चालकांने विसरलेल्या प्रवाशाची पर्स परत करुन अजूनही माणुसकी शिल्लक असल्याचे दाखून दिले आहे.

समाजात अजूनही प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचे समोर आले आहे. लोकल पकडण्यासाठी घाईघाईनं रिक्षातून उतरलेल्या एका नवविवाहित तरुणीची पर्स रिक्षाचालकांने प्रामाणिकपणे त्या महिलेला परत केली आहे. नवी मुंबईतील रिक्षाचालक प्रशांत पवार (२१) असे त्यांचे नाव आहे. या पर्समध्ये ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र होतं, परंतु विसरलेल्या पर्ससह या रिक्षाचालकांने मंगळसूत्र परत केले आहे. या रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा पाहून कोपरखैरणे पोलिसांनी रिक्षाचालक प्रशांत पवार यांचा सत्कार केला आहे.

अशी परत मिळाली पर्स

नवी मुंबईमधील कोपरखैरणे या ठिकाणाहून आपल्या घरी जाण्यासाठी निघालेल्या भाविका भानुशाली या लोकल पकडण्यासाठी गडबडीत रिक्षातून उतरल्या. मात्र या गडबडीत त्या आपली पर्स रिक्षात विसरल्या आणि निघून गेल्या. सासरी पोहोचल्यावर त्यांना आपण पर्स विसरल्याचे यांच्या लक्षात आले. त्या पुन्हा कोपरखैरणे येथे येऊन आईला सोबत घेऊन त्यांनी कोपरखैरणे पोलिसात रिक्षात आपली पर्स विसरल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुर्यकांत जगदाळे यांनी ऑटो युनियनशी संपर्क साधला. तसेच व्हॉटसअॅपच्या ग्रुपवर पर्स हरवल्याचा मेसेज टाकला. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रिक्षाचालक प्रशांत पवारने व्हॉटसअॅपवरील मेसेज वाचला आणि पोलिसांना फोन करुन हरवलेली पर्स आपल्याकडे असल्याची माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रिक्षाचालक प्रशांत पवार यांनी आपली पर्स कोपरखैरणी पोलिसात घेऊन जाऊन पोलिसांकडे सुपूर्द केली.

- Advertisement -

वाचा – रिक्षाचालकाने परत केले प्रवाशाचे पैसै

वाचा – प्रामाणिक टॅक्सीचालक शेखने परत केले ७ लाखांचे दागिने

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -