मुंबईतील आणखी २४ उड्डाणपुलांचे सर्वेक्षण होणार!

मुंबईतील आणखी २४ उड्डाणपुलांचे सर्वेक्षण होणार!

मुंबईतील जुन्या- धोकादायक रेल्वे पादचारी पूल, पादचारी पूल यांसह इतर पुलांचे सर्वेक्षण मुंबई महानगरपालिकेने आपला मोर्चा मुंबईतील २४ उड्डाणपुलांकडे वळवला आहे. या पुलांची सध्याची परिस्थिती तपासून घेत आवश्यकतेप्रमाणे दुरस्ती या पुनर्बांधणी करण्याची गरज आहे का हे जाणून घेत त्यानुसार पुढील कारवाई करण्याच्या दृष्टीने पालिकेने हा निर्णय घेतला आहे. यासाठी अंदाजे १ कोटी २४ लाख ७५ हजार रूपये खर्च अपेक्षीत आहे. लवकरच स्थायी समितीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.

मुंबईतील बरेचसे पुल जूने, ब्रिटीशकालीन आहेत त्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. गोखले पुल आणि हिमालय पुलासारख्या दुर्घटना घडल्या असून त्यात अनेक निष्पापांना जीव गमवावा लागला आहे. या घटनांनतर पालिकेसह रेल्वेवर मोठी टीका झाली. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या या दोन्ही यंत्रणांनी गेल्या दोन वर्षात मुंबईतील पुलांकडे लक्ष देत त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट आणि सर्वेक्षण करून घेतले आहे. तर या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार पुलांची गुरूस्ती वा पुर्नर्बांधणी करण्यात येत आहे. अशात पालिकेकडून मुंबईतील २४ महत्त्वाचे आणि मोठे उ्डडाणपुलही आहेत. हे पूल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कडून पालिकेला हस्तांतरीत करण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व जबाबदाऱ्या पालिकेकडे आहेत. त्यानुसार काही उड्डाणपुल जुने आणि नादुरूस्त झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालिकेने सर्वेक्षणाा निर्णय़ घेतला आहे.

या कामासठी व्हीडेटीआय या संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याबरोबरच व्हीजेटीआयकडून उड्डाणपुलांच्या सर्वेक्षणाला सुरूवात करण्यात येणार आहे. सध्या मुंबईतील अनेक पादचारी, रेल्वे ओव्हर ब्रीज बंद आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला असून पादचाऱ्यांची मोठी अडचण होत आहे. त्यातच दुरूस्ती- पुर्नर्बांधणी काम हाती घेतल्यास मुंबईकरांच्या अडचणी वाढणार आहे.

First Published on: January 28, 2020 9:26 AM
Exit mobile version