बॉलीवूड फॅशन डिझायनरच्या घरी चोरी करणार्‍या नोकराला अटक

बॉलीवूड फॅशन डिझायनरच्या घरी चोरी करणार्‍या नोकराला अटक

प्रातिनिधिक फोटो

बॉलीवूड फॅशन डिझायन रोहित वर्मा यांच्या घरी चोरी करुन पळून गेलेल्या नोकराला आंबोली पोलिसांनी अटक केली. रिशीराम ऊर्फ हुमाकांत प्रेमनारायण कुशाल असे या नोकराचे नाव असून त्याच्याकडून चोरीस गेलेली विदेशी चलनासह भारतीय चलन पोलिसांनी हस्तगत केली आहे. हुमाकांत हा मूळचा नेपाळचा रहिवाशी असून चोरीनंतर तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र गुन्हा दाखल होताच अवघ्या दोन तासांत त्याला आंबोली पोलिसांच्या एका विशेष पथकाने मिरारोड येथून अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

विदेशी चलनाची चोरीअटकेनंतर त्याला येथील स्थानिक न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. रोहित वर्मा हा बॉलीवूड फॅशन डिझायनर म्हणून काम करतो. त्याने बीग बॉसच्या सीझनमध्ये स्पर्धेक म्हणून भाग घेतला होता. तसेच झूम टिव्ही स्टाईल स्ट्रिपमध्येही त्याचा सहभाग होता. मधुर भंडारकर यांच्या बहुचर्चित चित्रपट फॅशनमध्येही त्याची एक छोटीशी भूमिका होती. त्याने आतापर्यंत अनेक बॉलीवूडच्या अभिनेत्रींसाठी डिझायनर म्हणून काम केले आहे. मंगळवारी प्रकृती ठिक नसल्याने ते त्यांच्या अंधेरीतील शास्त्रीनगरातील फ्लॅटमध्ये झोपले होते. यावेळी त्यांच्याकडे काम करणारा नोकर हुमाकांत याने त्याच्याकडून शंभर रुपये भाजी आणण्यासाठी घेतले. सकाळी रोहित हे झोपेतून उठले असता त्यांना हुमाकांत हा घरी नव्हता, तसेच कपाटातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. त्यांच्या कपाटातील दहा हजार रुपयांचे विदेशी चलन आणि दहा हजार रुपयांचे भारतीय चलन अशी कॅश चोरीस गेल्याचे समजले.

दोन तासांत अटकहुमाकांत घरातून निघून गेल्याने त्यानेच ही चोरी केली असावी असा अंदाज येताच त्याने आंबोली पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याने हुमाकांतविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंद होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड यांच्या पथकातील अमृत पवार, मोहम्मद खान, अनिल बोमटे, सुभाष कुंभार, श्रीकांत कुर्‍हाडे यांनी आरोपी नोकराचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच अवघ्या दोन तासांत हुमांकात कुशाल याला मिरारोड येथून पोलिसांनी अटक केली. तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. तो मूळचा नेपाळी असून एक महिन्यांपूर्वीच रोहित वर्मा याच्याकडे बदली नोकर म्हणून कामाला लागला होता. त्याच्याकडून विदेशी चलनासह काही रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

First Published on: August 31, 2018 4:00 AM
Exit mobile version