तृतीयपंथी समाजाच्या नेत्या प्रिया पाटील राष्ट्रवादीत

तृतीयपंथी समाजाच्या नेत्या प्रिया पाटील राष्ट्रवादीत

प्रिया पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय मंडळी पक्षप्रवेश करत आहेत. शिवसेनेचे उपनेते अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता तृतीयपंथी समाजाच्या नेत्या प्रिया पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जाहीर प्रवेश केला. प्रिया पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी सदस्याची जबाबदारी देण्यात आली. त्यांना याबाबतचे पत्र देखील देण्यात आले आहे.

दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले की, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही या ट्रान्सजेन्डर जातीसाठी काम केले आहे. त्यात प्रिया पाटील यांची महत्त्वाची भूमिका आहे. ३७७ बिलच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस उभी राहिली आहे. आम्ही सर्वसमाज घटकांना सोबत घेवून चालणारे लोक आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान,समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रवादीने नेहमी पुढाकार घेतला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. आघाडी सरकार असताना २००४ साली संजय गांधी निराधार योजनेचा लाभ ट्रान्सजेन्डर जातीसाठी देण्यात आला होता असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पक्षाशी एकनिष्ठ राहीन

राष्ट्रवादीने ही संधी मला दिल्याबद्दल राष्ट्रवादीचे प्रिया पाटील यांनी आभार मानले. त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक प्रश्नांसाठी मदत केल्याची कबुली देताना पक्षाशी एकनिष्ठ राहीन, अशी स्पष्ट भूमिका प्रिया पाटील यांनी मांडली.

First Published on: March 7, 2019 5:42 PM
Exit mobile version