हे सरकार 100 टक्के घटनाबाह्य; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर संजय राऊतांचे मत

हे सरकार 100 टक्के घटनाबाह्य; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर संजय राऊतांचे मत

संग्रहित छायाचित्र

मुंबई : सत्तासंघर्षाच्या निकाल सर्वोच्च न्यायालयाने 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग केला आहे. या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना आम्ही पुर्रस्थापीत करू शकलो असतो, हे न्यायालयाचे निरीक्षण आहे. याचाच अर्थ उद्धव ठाकरेंचे सरकार बेकायदेशीरपणे घालवणे आणि हे सरकार 100 टक्के घटनाबाह्य आहे.

संजय राऊत म्हणाले की, सरकार पूर्णपणे बेकायदेशी, घटनाबाह्य आहे यावर सर्वोच्च न्यायालयाने शिकामोर्तब केला आहे. सोयीचे निकाल कोणीही देऊ नये, त्याबद्दल कोणीही आपले मत मांडू नये. शिंदे गटाने बजावलेला बीप बेकायदेशीर ठरल्यानंतर पुढची सर्व प्रक्रिया बेकायदेशीर आहे. कोणत्याही गटाला शिवसेनावर म्हणजे पक्षावर दावा करता येणार नाही, हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. राज्यपालांनी घेतलेली प्रत्येक भूमिका ही बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. विश्वासदर्शक ठरावापासून पुढची प्रत्येक प्रक्रिया त्यांनी राजकीय हेतून केली होती.

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना आम्ही पुर्रस्थापीत करू शकलो असतो, हे न्यायालयाचे निरीक्षण आहे. याचाच अर्थ उद्धव ठाकरेंचे सरकार बेकायदेशीरपणे घालवणे आणि हे सरकार 100 टक्के घटनाबाह्य आहे. आता 16 आमदारांचा निकाल जर विधानसभा अध्यक्षांकडे येणार असेल तर येऊ द्या. बीपच बेकायदेशीर आहे. संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर आहे. मग विधानसभेच्या अध्यक्षांनी बेकायदेशीर प्रक्रियेवरती आपली भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे. जर घटनेनुसार देश चालणार असेल, लोकशाहीनुसार चालणार असेल तर विधानसभा अध्यक्षांनी आपण कायद्याच्या संविधानाच्या बाजूने आहोत की घटनाबाह्य बेकायदेशीर लोकांच्या बाजूने आहोत. विधानसभा अध्यक्ष कायदेपंडीत आहेत, त्यांनी पाहायला पाहिजे. आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल देशाच्या लोकशाहीला दिशा देणारा आहे.

सविस्तर बातमी लवकरच

First Published on: May 11, 2023 12:49 PM
Exit mobile version