नववर्षाच्या निमित्ताने सोनं खरेदी करताय, जाणून घ्या आजचा दर

नववर्षाच्या निमित्ताने सोनं खरेदी करताय, जाणून घ्या आजचा दर

सोन्याचे दर

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाढवा. गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. या दिवशी थोडे का होईना सोनं खरेदी केले जाते. कोणी एक ग्रॅम तर कोणी वळं तरी खरेदी करतात. कारण आजच्या शुभ दिवशी सोनं खरेदी करणे चांगले मानल जात. खरंतर गेल्या दोन दिवसांपासून सोन्याचे दर घसरले होते. परंतु, पुन्हा एकदा आज सोन्यात तेजी आली आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज सोन्याने भाव खाल्ला आहे. आज सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४० रुपयांनी महागले आहे. आज २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ४५ हजार ७५० इतकी आहे. तर चांदीचे देखील दर वाढले आहेत. चांदी प्रति किलो ३०० रुपये महाग झाली आहे. तर चांदीची किंमत ६७ हजार २०० रुपये प्रति किलो झाली आहे.

विक्रमी दरापेक्षा १० हजारांनी घसरले

कोरोनाच्या काळात सोन्याने भलताच भाव खाल्ला होता. अक्षरश: ५० हजारच्या वर सोन्याचे दर गेले होते. मात्र, सध्याचा सोन्याचा दर हा विक्रमी दरापेक्षा १० हजार रुपयांनी खाली आला आहे. याआधी तर ही घसरण १२ हजार रुपयांपर्यंत गेली होती. मात्र, गेल्या काही आठवड्यात सोन्याचा दर दोन हजार रुपयांनी वधारला आहे. सध्या सोने किंमतीत तेजी दिसत असल्याने सराफ उद्योगात आनंदाचे वातावरण आहे.

गोल्ड वेबसाईटनुसार, दिल्लीत २२ कॅरेट सोन्याची किंमत ४५ हजार ७०० आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत ४८ हजार ८६० इतकी आहे. तर मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा दर ४४ हजार ७५० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४५ हजार ७५० रुपये इतका आहे.


हेही वाचा – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राजकीय नेतेमंडळींकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा!


 

First Published on: April 13, 2021 1:36 PM
Exit mobile version