Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राजकीय नेतेमंडळींकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा !

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राजकीय नेतेमंडळींकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा !

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोना संकट गडद होत असल्याने यंदाचा गुढीपाडवा सण साजरा करण्यावर मर्यादा आल्या. शासनाकडूनही हा सण घरात सुरक्षित राहून साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान अनेक जण घरात राहून गुढीपाडवा सणाचा आनंद घेताना दिसतायतं. या अनेक राजकीय नेते, मंत्री गुढी पाडवा, नववर्ष प्रारंभाच्या नागरिकांना शुभेच्छा देत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस अशा अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

कोरोनावर मात करून आरोग्याची गुढी उभारूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना विषाणूवर मात हिच आता आरोग्याची गुढी असेल. त्यासाठी सर्वांनीच एकमेकांची काळजी घ्यावी. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे ही त्रिसुत्री पाळावी असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (दि.१३) साजरा होणाऱ्या गुढी पाडव्याच्या आणि नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात.

- Advertisement -

यशाच्या उंच गुढ्यांमध्ये एक गुढी ‘कोरोनामुक्ती’च्या विजयाची – उपमुख्यमंत्री अजित पवार

वसंतऋतुच्या आगमनासोबत सुरु होणारं मराठी नववर्ष आणि त्यानिमित्ताने साजरा होणारा गुढीपाडव्याचा सण सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. मनातील नवनिर्मितीच्या कल्पनांना चैत्रपालवीची संजीवनी मिळो. जीवनात यशाच्या उंच गुढ्या उभारण्याची स्वप्ने पूर्ण होवोत. यशाच्या त्या उंच गुढ्यांमध्ये एक गुढी ‘कोरोनामुक्ती’च्या विजयाचीही असो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

राज्याचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्चा दिल्या आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही तमाम हिंदू बांधवांना गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोरोना नियमांचे पालन करत गुढीपाडवा साजरा करा असे आवाहन केले व पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाडांकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनीही गुढीपाडला व मराठी नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

सर्वांना हिंदू नव वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा- विधानसभा विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

गुढी उभारा दृढ निश्चयाची, स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्य रक्षणाची- मदत व पुर्नवसन मंत्री विजय वड्डेटीवार


 

- Advertisement -