गुंतवणुकीच्या आमिषाने व्यापार्‍याची ६७ लाखांची फसवणूक

गुंतवणुकीच्या आमिषाने व्यापार्‍याची ६७ लाखांची फसवणूक

प्रातिनिधिक फोटो

मुंबई : सफीना तेलाच्या व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका ज्वेलर्स व्यापार्‍याची फसवणूक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा नोंदवून वॉण्टेड असलेल्या दोन आरोपींना अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे. जयगणेश मोहन पठ्ठे आणि आयकेब ओकोरके अशी या दोघांची नावे असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत या दोघांनाही वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. फसवणुक करणारी ही एक सराईत टोळी आहे. त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यातील तक्रारदार सोन्याचे व्यापारी असून त्यांचा सोन्याचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहेत. जून महिन्यात ते त्यांच्या सोशल मिडीयावर कार्यरत असताना त्यांच्याशी या दोन्ही भामट्यांनी संपर्क साधला होता. सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांची दोन्ही आरोपींशी ओळख झाली होती. यावेळी त्यांनी त्यांचा सफीना तेलाचा व्यवसाय असून देश-विदेशात या व्यवसायात प्रचंड फायदा होत असल्याचे सांगितले. त्यांनीही याच व्यवसायात गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला फायदा मिळवून देऊ असे आश्वासन दिले होते.

६७ कोटी जमा

डेमो दाखवून त्यांनी त्यांचा सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. या दोघांच्या बतावणी भुलून त्यांनी या व्यवसायात गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला, त्यांनी दिलेल्या बँक खात्यात तक्रारदार व्यापार्‍याने सुमारे 67 लाख रुपये जमा केले होते. मात्र या दोघांनी त्यांना सफीना प्रोटीन तेलाचा पुरवठा केला नाही, बँकेत पैसे होताच या दोघांनी त्यांचे फेसबुक अकाऊंटसह मोबाईल बंद केले होते. या दोघांनी फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्यांनी अंधेरी पोलिसांत तक्रार केली होती.

आयटी कलमांतर्गत गुन्हा

या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर अंधेरी पोलिसांनी फसवणुकीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. अशाच एका गुन्ह्यात दोन्ही आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीत या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते, पोलीस कोठडीनंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर या दोघांचा ताबा स्थानिक न्यायालयात अर्ज करुन अंधेरी पोलिसांना सोपविण्यात आला होता.

फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येणार

अपहार आणि फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असून त्यांच्या चौकशीतून इतर काही फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. फसवणुक केलेली रक्कम या दोघांनी कुठे गुंतवली आहे, त्यांचे इतर काही सहकारी आहेत, या टोळीने आतापर्यंत मुंबईसह इतर शहरात अशा प्रकारचे गुन्हे केले आहे का याचा आता पोलीस तपास करीत आहेत.

First Published on: September 26, 2018 1:30 AM
Exit mobile version