लव्ह जिहादमधून तुनिषाची हत्या?; भाजप नेत्यांचा आरोप

लव्ह जिहादमधून तुनिषाची हत्या?; भाजप नेत्यांचा आरोप

मुंबईः हिंदी मालिका अभिनेत्री तुनिषा शर्माची आत्महत्या ही लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप भाजप नेत्यांना केला आहे. तसेच लव्ह जिहादविरोधात कठोर कायदा करणार असल्याचा दावाही भाजपने केला आहे.

याबाबत भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन म्हणाले, तुनिषाची आम्हत्या हा लव्ह जिहादचा प्रकार आहे. पोलीस त्याचा तपास करत आहेत. लव्ह जिहादविरोधात कठोर कायदा करण्याचा विचार आम्ही करत आहोत.

भाजप आमदार राम कदम हेही या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. ते म्हणाले, तुनिषाच्या आत्महत्येत लव्ह जिहादचे कनेक्शन समोर आले तर पोलीस त्याबाबतही तपास करतील. लव्ह जिहादच्यामागे कोणती संघटना आहे का?, हे कोणाचे षडयंत्र आहे, याचा तपास पोलीस करतील व तुनिषाच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देतील, असे आमदार राम कदम यांनी सांगितले.

मात्र आतापर्यंतच्या तपासात लव्ह जिहादचे कनेक्श समोर आलेले नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.  सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी सांगितले आहे की, आतापर्यंतच्या तपासात कोणत्याही अन्य प्रकारची, ब्लॅकमेलिंग किंवा लव्ह जिहादबाबतची काही ठोस माहिती हाती आलेली नाही. पोलिसांचे तपासकार्य सुरू आहे आणि आरोपी शिझान आणि तुनिषाचे फोन ताब्यात घेण्यात आले आहेत.

तुनिषा शर्माने २४ डिसेंबरला, शुक्रवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. वसई पूर्वेला कामण येथील एका स्टुडिओमधील प्रसाधनगृहात तिने गळफास घेतला. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुनिषा सब टीव्हीच्या दास्तान-ए-काबुल या कार्यक्रमात मुख्य भूमिकेत काम करत होती. याच मालिकेचे शूटिंग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्येच तिने गळफास घेतला. तुनिषाने आत्महत्या केल्यानंतर सेटवरील लोकांनी तिला रुग्णालयात नेले होते. त्याठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तिचा प्रियकर शिझान खानला काल अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस याचा अधिक तपास करत आहे. तुनिषाने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली याचाही तपास पोलीस करत आहेत.

First Published on: December 26, 2022 10:03 AM
Exit mobile version