मुंबईसमोर कोरोनासोबत स्वाईन फ्ल्यूचे संकट; सहा वॉर्डांमध्ये सापडले १२ रुग्ण

मुंबईसमोर कोरोनासोबत स्वाईन फ्ल्यूचे संकट; सहा वॉर्डांमध्ये सापडले १२ रुग्ण

मुंबईसमोर कोरोनासोबत स्वाईन फ्ल्यूचे संकट; सहा वॉर्डांमध्ये सापडले १२ रुग्ण

मुंबईत साथीच्या आजाराचे प्रमाण दिवेदिंवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईमध्ये ताप, खोकला, सर्दी, मलेरिया, डेंग्यू, लेप्टो या आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. जुलैमध्ये मुंबईच्या सहा वॉर्डांमध्ये तब्बल १२ रुग्ण आढळून आल्याचे पालिका आरोग्य विभागाने अ‍ॅलर्ट राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावल्यामुळे साथीच्या आजारांमुळे मुंबईकर चांगलेच हैराण झाले आहे. मुंबईमध्ये जुलैमध्ये स्वाईन फ्लूचे १२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना आता कोरोनाबरोबर साथीच्या आजारांचाही सामना करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे. मुंबई महापालिकेच्या मलबार हिल, ताडदेव, ग्रँटरोड, वरळी (जी दक्षिण), अंधेरी-पूर्व (के/पूर्व), अंधेरी-पश्चिम (के/पश्चिम), गोरेगाव (पी-दक्षिण) व मुलुंड (टी वॉर्ड) या वॉर्डमध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण सापडले असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, गतवर्षी जुलै २०२० मध्ये स्वाईन फ्लूचा एकच रुग्ण आढळला होता. पण यंदा ११ दिवसात स्वाइन फ्लूचे १२ रुग्ण आढळले आहेत. यामुळे मुंबईकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी, ताप आल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, पाणी उकळून पिणे, बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे असे आवाहन पालिका आरोग्य विभागाने केले आहे.

स्वाइन फ्लूची आकडेवारी

२०१९ – ४५१
२०२० – ४४
जुलै २०२१ – १९

 

First Published on: July 17, 2021 9:09 PM
Exit mobile version