कॅनडीयन महिलेच्या विनयभंग प्रकरणी दोघांना अटक

कॅनडीयन महिलेच्या विनयभंग प्रकरणी दोघांना अटक

प्रातिनिधिक फोटो

कॅनडातून भारतात फिरण्यासाठी आलेल्या एका कॅनडीयन महिला पर्यटकाबरोबर भारतीय नागरिकांनी गैर प्रकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने मालाड येथील बांगूरनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. आपल्या मदत करत असल्याचे सांगून या दोघांना तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या महिलेनी केला आहे. या प्रकरणी दोघांजणांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान पीडित महिलेला या दोघांच्या तावडीतून सोडवण्यात आले आहे.

कसा घडला प्रकार

पीडित महिला आणि तिचा मित्र कॅनडाहून मुंबईत फिरण्यासाठी आली होती. मालाड येथील एका हॉटेलमध्ये जेवत असताना या महिलेला दोघजण भेटली. त्यांनी या महिलेशी मैत्री केली. महिलेला मद्य पिण्यासाठी या दोघांना मालाड येथील घरी बोलावले. मद्य पिल्यानंतर रात्री ३ च्या सुमारास या दोघांनी महिलेबरोबर गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडित महिलेने आरडा ओरडा केली. रात्री बांगूर नगर पोलीस ठाण्यात जाऊन  तिने या दोघांविरोधात विनयभंगाची तक्रार केली.

काय केलेत आरोप

आरोपींनी आपण कॅनडाचे असल्याचे या महिलेला सांगितले होते. असे सांगून त्यांनी महिलेशी मैत्री केली. यानंतर तिला व तिच्या मित्राला स्वतःच्या फ्लॅटवर घेऊन गेले. तिथे त्यांनी दोघांना मद्य पाजले. मित्र दुसऱ्या खोलीत झोपला असताना रात्री आरोपींनी गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला.

” पीडित महिला पोलीस ठाण्यात आली त्यावेळी अतिशय घाबरली होती. अमरदिप सिंग आणि साहेब सिंग या दोघांविरोधात तक्रार नोंदवली आहे. या दोघांना ३५४ कलमांअतर्गत अटक करण्यात आली आहे.”- बांगूरनगर पोलीस अधिकारी 

First Published on: December 7, 2018 11:34 AM
Exit mobile version