Eco friendly bappa Competition
घर मुंबई विमानतळावर महिलेचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला अटक

विमानतळावर महिलेचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला अटक

Subscribe

खरेदीचा बहाणा करुन विमानतळावरच एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे.

खरेदीचा बहाणा करुन विमानतळावरच एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. सोहेल अहमद मोहम्मद आझीम असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विमानतळ परिसरात झालेली ही तिसरी घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोहेल आझीम हा मूळचा आंध्रप्रदेशचा रहिवाशी आहे. शुक्रवार, २३ नोव्हेंबर रोजी तो काही कामानिमित्त आंध प्रदेशातून मुंबईत आला होता. यावेळी तो विमानतळावरील एका दुकानात गेला. तिथे वस्तू खरेदी करण्याचा बहाणा करुन त्याने एका महिलेशी अश्लील संभाषण करण्यास सुरुवात केली होती.

अश्लील वर्तन करुन संभाषण केले

सुरुवातीला या महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले होते, मात्र सोहेल हा सतत तिच्याशी अश्लील वर्तन करुन संभाषण करु लागल्याने तिने ही माहिती तिथे उपस्थित सीआयएसएफच्या अधिकार्‍यांना सांगितली. या घटनेनंतर त्याला या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले होते. त्याला पुढील कारवाईसाठी नंतर विमानतळ पोलिसांकडे सोपविण्यात आले. या महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला नंतर वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -