मुंबई-पुणे आणि मुंबई-चेन्नई दरम्यानच्या गाड्या पूर्ववत

मुंबई-पुणे आणि मुंबई-चेन्नई दरम्यानच्या गाड्या पूर्ववत

मनमाड आणि हुजूर साहिब नांदेड दरम्यान डेमू  विशेष सेवा पूर्ववत

मध्य रेल्वेने मुंबई – पुणे आणि मुंबई – चेन्नई दरम्यानच्या रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खाली दिल्यानुसार:

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे इंटरसिटी दैनंदिन सेवा

१२१२७ इंटरसिटी एक्सप्रेस ०१ डिसेंबर २०२१ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज ०६.४० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी ०९.५७ वाजता पोहोचेल.

१२१२८ इंटरसिटी एक्सप्रेस  ०१ डिसेंबर २०२१ पासून पुणे येथून दररोज १७.५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २१.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, लोणावळा आणि शिवाजी नगर (फक्त १२१२७ साठी)

संरचना: दोन वातानुकूलित चेअर कार आणि १२ द्वितीय आसन श्रेणी.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चेन्नई एग्मोर अतिजलद त्रि-साप्ताहिक सेवा

२२१५७ अतिजलद १ डिसेंबर २०२१ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी २२.५५ वाजता सुटेल आणि चेन्नई एग्मोर येथे दुसऱ्या दिवशी २२.१५ वाजता पोहोचेल.

२२१५८ अतिजलद  ४ डिसेंबर २०२१ पासून चेन्नई एग्मोर येथून दर गुरुवार, शनिवार आणि सोमवारी ०६.२० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०५.५० वाजता पोहोचेल.

थांबे: दादर, कल्याण, खडकी, पुणे, दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, सोलापूर, अक्कलकोट रोड, दुधनी, गाणगापूर रोड, कलबुर्गी, वाडी, नलवर, यादगीर, सैदापूर, कृष्णा, रायचूर, मंत्रालयम रोड, कोसगी, अदोनी, गुंटकल, गूटी, ताडीपत्री, येरागुंटला, कडपा, रेनिगुंटा, अरक्कोनम (फक्त २२१५७ साठी) आणि पेरांबूर (फक्त २२१५७ साठी).

संरचना: १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान आणि ४ द्वितीय आसन श्रेणी.

आरक्षण: पूर्णतः आरक्षित पाऊस क्रमांक १२१२७/१२१२८ आणि २२१५७ साठी सामान्य शुल्कासह बुकिंग २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

वरील गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा.फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व नियमांचे पालन करून या ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाईल.


हे ही वाचा : ज्ञानदेव वानखेडेंची मलिकांविरोधात पुन्हा हायकोर्टात याचिका, खंडपीठाच्या निर्णयालाच आव्हान


 

First Published on: November 24, 2021 4:06 PM
Exit mobile version