ज्ञानदेव वानखेडेंची मलिकांविरोधात पुन्हा हायकोर्टात याचिका, खंडपीठाच्या निर्णयालाच आव्हान

dnyandev wankhede challenged order of single bench decision high court file plea nawab malik
ज्ञानदेव वानखेडेंची मलिकांविरोधात पुन्हा हायकोर्टात याचिका, खंडपीठाच्या निर्णयालाच आव्हान

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडेंनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांविरोधात पुन्हा हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मुंबई हायकोर्टाच्या एकल खंडपीठाने वानखेडेंच्या मानहानीचा दावा ठोकलेल्या याचिकेवर सुनावणी करताना नवाब मलिकांना दिलासा दिला होता. न्यायालयाने नवाब मलिकांना कोणतंही विवादित वक्तव्य करण्यापासून रोखले नाही यामुळे वानखेडेंनी न्यायालयाच्या एकल खंडपिठाला हायकोर्टात खंडपिठापुढे आव्हान दिलं आहे. नवाब मलिकांना न्यायालयाने दिलासा नाही दिला पाहिजे असं ज्ञानदेव वानखेडे यांचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर जात प्रमाणपत्रावरुन आरोप केले आहेत. तसेच समीर वानखेडे यांना समीर दाऊद वानखेडे असे सोशल मीडियावर बोलत आहेत. याविरोधातच समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी हायकोर्टात मानहानीचा दावा केला आहे. नवाब मलिकांना असे वक्तव्य आणि आरोप करण्यास रोखण्यात यावे आणि समीर दाऊद वानखेडे असे अधिकारी समीर वानखेडे यांना बोलू नये. परिवाराबाबतही कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य मलिकांना करण्यापासून रोखण्यात यावे अशी मागणी ज्ञानदेव वानखेडे यांनी याचिकेमध्ये केली आहे.

वानखेडेंना न्यायालयाचा दिलासा नाही

ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेंवर जातीय आरोप करत आहेत. यामुळे वानखेडेंनी याचिका दाखल केली होती. परंतु नवाब मलिकांनी कोणतीही माहिती घेतल्याशिवाय, सत्यता पडताळल्याशिवाय बोलू नये असे न्यायालयाने म्हटलं आहे. परंतु नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोटे ठरवण्यासाठीचे पुरावे सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने वानखेडेंना दिला होता. वानखेडेंना न्यायालयाचा दिलासा अद्याप मिळाला नाही आहे. तर नवाब मलिकांनी आता समीर वानखेडे यांचा शाळेचा दाखला आणि इतर कागदपत्रे कोर्टात दाखल केले आहेत.

वानखेडेंनी बोगस कागदपत्रे तयार केली

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी जातप्रमाणपत्र बनावट वापरले असल्याचा आरोप राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी केला आहे. वानखेडेंनी बनावट कारवाई करुन अनेकांना फसवलं आहे. तसेच बॉलीवुड कलाकरांकडून वसुली केली असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणही बनावट असून केवळ महाराष्ट्र आणि बॉलिवूडला बदनाम करण्यासाठी कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.


हेही वाचा : महासंचालक पदाच्या यादीतून संजय पांडेंचे नाव केंद्राने हटवले