येडीयुरप्पांची आज अग्निपरीक्षा

येडीयुरप्पांची आज अग्निपरीक्षा

Former Chief Minister Yediyurappa's son was denied ticket to Legislative Assembly by BJP

जळणार की उजळणार ! भाजपचे देव पाण्यात !

कर्नाटक विधानसभेत आज शनिवारी संध्याकाळी ४ वाजता बहुमत सिद्ध करा, असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने भाजपचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना दिला आहे. येडीयुरप्पांची ही अग्निपरीक्षा असून त्यात ते जळणार की, उजळून निघणार हे शनिवारी सिद्ध होईल. त्यांना यश मिळावे यासाठी भाजपने देव पाण्यात ठेवले आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजप आता आमदारांची जुळवाजुळव कशी करतो, याविषयी सगळ्यांना उत्सुकता आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी अधिक वेळ देण्यात यावा, अशी मागणी भाजपाच्या वकिलांकडून न्यायालयाकडे करण्यात आली होती. तर आम्ही उद्याही बहुमत सिद्ध करण्यास तयार आहोत, असा आक्रमक पवित्रा काँग्रेसचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयात घेतला होता.

राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला होता. भाजपाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने या दिवसांमध्ये घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात होती. या प्रकरणी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली.

First Published on: May 19, 2018 6:13 AM
Exit mobile version