जे. जे.च्या डॉक्टरांनी तरुणाला मरणाच्या दारातून परत आणले

जे. जे.च्या डॉक्टरांनी तरुणाला मरणाच्या दारातून परत आणले

जे. जे. हॉस्पिटल

एखाद्या व्यक्तीला किडनीचे विकार जडले की त्याला आयुष्यभर डायलिसीसवर ठेवावं लागतं. पण, सतत डायलिसीस करुन रुग्णांना खूप त्रास सहन करावा लागतो. २२ वर्षीय मोहम्मदीन (बदललेले नाव) याला जन्मजात किडनीचा त्रास होता. लघवीच्या पिशवीचं ऑपरेशन करुनही त्याच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्या होत्या. गेली सात ते आठ वर्ष तो डायलिसीसवरच आहे. पण, डायलिसीससाठी हातांच्या नसांमध्ये सुया टोचाव्या लागतात. सतत नसांमध्ये सुया टोचल्यामुळे एका काळानंतर कुठे सुई टोचायची? असा प्रश्न डॉक्टरांसमोर होता. काहीच पर्याय नसल्यामुळे नेमकं कशा पद्धतीने डायलिसीस करायंच हा प्रश्न डॉक्टरांना सतावत होता. तो अतिशय गंभीर परिस्थितीत जे.जे हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. त्याला ४५ दिवस पोटाचं डायलिसीसवर ठेवलं गेलं. मोहम्मदीनला योग्य पद्धतीने डायलिसीसवर आणता यावं यासाठी जे. जे. तील डॉक्टर्स आणि सर्जन्सनी त्याच्यावर ‘व्हॅस्क्युलर ग्राफ्ट’ ही शस्त्रक्रिया करायची ठरवली आणि त्याला मरणाच्या दारातून परत आणलं.

‘ही’ एक दुर्मिळ शस्त्रक्रिया

किडनी डायलिसीसमध्ये नसा ब्लॉक झाल्या की व्हॅस्क्युलर ग्राफ्ट करुन घेणं हे सामान्य आहे. पण, ओपन हार्ट सर्जरी (शरीराच्या बाहेरुन) करुन व्हॅस्क्युलर ग्राफ्ट सर्जरी करुन नळी टाकणं हे खूप दुर्मिळ शस्त्रक्रिया आहे. जी जगातील हॉस्पिटल्सपैकी पहिल्यांदाच जे.जे. मध्ये करण्यात आली आहे. मोहम्मदीनवर व्हॅस्क्युलर ग्राफ्ट ही शस्त्रक्रिया केली गेली. म्हणजेच त्याच्यावर ओपन हार्ट सर्जरी करुन तिथून एक नळी टाकली गेली. त्या नळीवाटे त्याचं डायलिसीस केलं जातं.

मोहम्मदीनला सतत डायलिसीस दिल्यामुळे त्याच्या नसा आकुंचन पावल्या होत्या. त्यामुळे डायलिसीस कसं करायचं हा प्रश्न होता. त्यामुळे सर्जन्सनी त्याच्यावर व्हॅस्क्युलर ग्राफ्ट ही सर्जरी केली. ओपन हार्ट सर्जरी करुन हृदयापर्यंत नळी टाकली गेली. तिथून त्याचं डायलिसीस केलं जात आहे. आता याच नळीतून त्याचं कायमस्वरुपी कॅथेटर टाकली जाणार आहे. वैद्यकीय अभ्यासात असं पहिल्यादांच घडलं आहे.
– डॉ. गीता शेटे, नेफ्रोलॉजीस्ट, जे.जे हॉस्पिटल

डिसेंबर महिन्यात मोहम्मदीन जे.जे. हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. आता त्याची प्रकृती स्थिर असून त्याला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात डिस्चार्ज देण्यात आला. येत्या शनिवारी किडनी डायलिसीससाठी त्याला कायमस्वरुपी कॅथेटर टाकण्यात येणार आहे, असंही डॉ. शेटे यांनी सांगितलं.

गर्भवतींनी घ्यावी काळजी

First Published on: March 14, 2019 5:03 AM
Exit mobile version