‘अटल करंडक’ स्पर्धेत कोण बाजी मारणार?; नाट्यरसिकांना उत्सुकता

‘अटल करंडक’ स्पर्धेत कोण बाजी मारणार?; नाट्यरसिकांना उत्सुकता

पनवेलमध्ये सुरु असलेल्या सातव्या राज्यस्तरीय ’अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेत विजेता कोण होणार याची प्रतिक्षा रविवार, ३१ जानेवारी रोजी संपणार असली तरी ’कोण बाजी मारणार?’ आणि एक लाख रुपये तसेच मानाचा ’अटल करंडक’ पटकविणार याची उत्सुकता राज्यातील रसिक प्रेक्षकांना लागली आहे. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय ’अटल करंडक’ एकांकिका स्पर्धा पनवेलमध्ये होत आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील ७५ एकांकिका सहभागी झाल्या होत्या. त्यातून सरस अशा २४ एकांकिकांची निवड सिने नाट्य क्षेत्रातील परिक्षकांनी अंतिम फेरीसाठी केली. स्पर्धेच्या पहिल्या आणि दुसर्‍या दिवशी प्रत्येकी नऊ एकांकिका सादर झाल्या तर उर्वरित सहा एकांकिका रविवारी सादर होणार आहेत.

दर्जेदार स्पर्धेचे दर्जेदार नियोजन या ठिकाणी बघायला मिळाले. त्यामुळे प्रेक्षकांनी आणि कलाकारांच्या टीमनेही आयोजकांच्या या आयोजनाची भरभरून स्तुती करत स्पर्धा अशीच सुरु रहावी असे वाटते, अशा शब्दात पोचपावती दिली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणार्‍या एकांकिकेला एक लाख रूपये आणि मानाचा अटल करंडक, द्वितीय क्रमांकास ५० हजार रूपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, ततीय क्रमांकास २५ हजार रूपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांकास १० हजार रूपये, उत्तेजनार्थ क्रमांकास ५ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, लेखक, संगीत, नेपथ्य, प्रकाशयोजना यांनाही पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

हेही वाचा –

…नाहीतर गोळ्या घालीन, शेतकरी नेते डॉ. अजित नवलेंना खुनाची धमकी

First Published on: January 31, 2021 3:44 PM
Exit mobile version