घरमहाराष्ट्र...नाहीतर गोळ्या घालीन, शेतकरी नेते डॉ. अजित नवलेंना खुनाची धमकी

…नाहीतर गोळ्या घालीन, शेतकरी नेते डॉ. अजित नवलेंना खुनाची धमकी

Subscribe

कोणाच्या धमकीमुळे कधीही एखादी चळवळ थांबत नाही

केंद्र सरकारने आणलेल्या तीन नव्या वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले आहे. याच आंदोलनाला देशभरातील शेतकरी पाठींबा देत आहेत. या कृषी कायद्यांना देशातून विरोध होत आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातही शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. राज्यातील शेतकरी मुंबईत राजभवनाकडे निघाले होते. परंतु या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या आणि राजभवनाकडे गेलेल्या शेतकरी नेत्यांना खुनाच्या धमक्या येत आहेत. मार्क्सवादी किसान सभेचे राज्य सचिव डॉ.अजित नवले यांना फेसबुकवरुन गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परंतु या प्रकरणाची अद्याप पोलिसांत तक्रार केली नाही. डॉ. अजित नवले मुंबईत झालेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी होते. तसेच डॉ.अजित नवलेंच्या नेतृत्वात मुंबईत शेतकरी आंदोलन पुकारले होते.

दिल्लीतील शेतकरी आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन पुकारले होते. या शेतकरी आंदोलनात राज्यातील विविध राज्यातील शेतकरी सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व डॉ.अजित नवले यांनी केले होते. कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी डॉ. अजित नवले यांनी केली होती. त्यांच्यासह इतर शेतकरी नेत्यांनाही खुनाच्या धमक्या आल्याचे समजते आहे.

- Advertisement -

नवलेंना खुनाची धमकी 

अज्ञात व्यक्तीने डॉ. अजित नवले यांना गुरुवारी २८ जानेवारीला फेसबुकवरुन खुनाची धमकी दिली. नीट राहा नाहीतर गोळ्या घालीन अशी धमकी देण्यात आली आहे. धमकी दिल्यानंतर कॉ. नरसय्या आडम यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. तसेच धमकी देणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचेही कॉ.नरसय्या यांनी सांगितले आहे. याबाबत अकोल्याच्या तहसिलदारांना सर्व पक्षीय संघटना आणि नेत्यांचा उपस्थिीत अकोल्याच्या तहसीलदारांना निदेन देण्यात आले आहे.

धमक्यांवर नवलेंची प्रतिक्रिया

डॉ. अजित नवले यांनी खुणाच्या धमकीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कोणाच्या धमकीमुळे कधीही एखादी चळवळ थांबत नाही. आजवर माणसं मरुन गेल्यावर त्यांचे विचार कधीही संपले नाहीत. सरकारच्या समर्थकांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. केंद्र सरकारविरोधात सुरु असलेले शेतकरी आंदोलन यशस्वी करण्यासाठी आम्ही जिवाचे रान करु आणि यासाठी आम्ही राजव्यापी दौरा करणार असल्याचे नवलेंनी सांगितले. या दौऱ्यामध्ये शेतकरी कायद्यांविरोधात रान पेटविणार असल्याचेही डॉ. अजित नवले यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -