मोदी सरकारच्या खासगीकरण धोरणाचा काँग्रेसकडून निषेध

मोदी सरकारच्या खासगीकरण धोरणाचा काँग्रेसकडून निषेध

केंद्रात असलेल्या मोदी सरकारने ’राष्ट्रीय मित्रिकरण’ योजनेच्या माध्यमातून अधिकृतपणे भारताची सार्वजनिक मालमत्ता विक्रीतून देशच विकायला काढला असून लोकांच्या कष्टातून उभी राहिलेली सरकारी मालकीची मालमत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भांडवलदार मित्रांच्या माध्यमातून विकायला सुरूवात केली असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. सरकारने ४०० रेल्वे स्टेशन, १५० गाड्या, पॉवर ट्रान्समिशन नेटवर्क, पेट्रोलियमचे नेटवर्क, सरकारी गोदामे, २५ विमानतळे आणि १६० कोळसा खाणी विकल्या असून हे सर्व उभारण्यासाठी ७० वर्ष लागली.

मोदी सरकारच्या या चुकीच्या निर्णयामुळे तरूणांचे भवितव्य अंधकारमय झाले असून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ही गोष्ट ओळखून तरूणांना या संदर्भात धोक्याचा इशारा दिला होता. तसेच या गोष्टीला विरोध करण्यासाठी हॅशटॅगच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन देखील केले होते. त्या आवाहनानुसार राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष निवासजी व कोकण विभागाचे प्रभारी प्रदीप सिंधव यांच्या आदेशानुसार बुधवारी वाशी सेक्टर १७ मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस व ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वात आणि नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रातील मोदी सरकार विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.

यावेळी नवी मुंबई काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता नासीर हुसैन, महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा उज्वला साळवे, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संदेश बनसोडे, सरचिटणीस अभिषेक पाटील, नवी मुंबई काँग्रेस कमिटीचे सचिव विनोद पाटील, नवी मुंबई युवा काँग्रेसचे सरचिटणीस विजय पाटील, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव अशोक सोनवणे, दीपक कोणाले नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव सुरेश मानवतकर, वाशी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन नाईक, नवी मुंबई सोशल मीडिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजस भांबुरे, ऐरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे सोशल मीडिया समन्वयक सुर्यकांत निवडुंगे, कोपरखैरणे ब्लॉक अध्यक्ष धोंडीराम पाटील, वॉर्ड क्र. २१ चे अध्यक्ष नितीन शेट्टी, घणसोली ब्लॉक उपाध्यक्ष साहेबराव बाजड, वॉर्ड क्र. २५ चे अध्यक्ष मोहन पोयरेकर, दिघा ब्लॉक सोशल मीडियाचे अध्यक्ष रॉबिन तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा –

शिवसेनेच्या शाखेतच विभाग प्रमुखावर धारदार शस्त्राने हल्ला, गंभीर जखमी

First Published on: August 26, 2021 8:25 PM
Exit mobile version