महापालिका मुख्यालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करा – आयुक्त अभिजीत बांगर

महापालिका मुख्यालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करा – आयुक्त अभिजीत बांगर

नवी मुंबई महापालिकेच्या कामगारांकरता समान काम, समान वेतन या विषयावर चर्चा करण्याची तयारी असतानाही काही आंदोलनकर्त्यांनी प्रशासन विभागाचे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्या दालनातील खुर्ची पळवली व मुख्यालयात ठिय्या आंदोलन केले. यामुळे महापालिका मुख्यालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. या घटनेचा निषेध करत महापालिका अधिकारी, कर्मचारी वृंदाच्या वतीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना निवेदन देऊन या प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची आग्रही मागणी शासनाकडे करावी व महापालिकेतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी, अशी विनंती करण्यात आली.

महापालिका अधिकारी, कर्मचार्‍यांच्या वतीने अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे यांच्यासह प्रशासन विभागाचे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, शहर अभियंता संजय देसाई, उप आयुक्त जयदीप पवार, डॉ. बाबासाहेब राजळे, मनोजकुमार महाले, परिवहन व्यवस्थापक योगेश कडुस्कर, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

नागरी सेवा सुविधा पुरविताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांना नियमानुसार वेतन व इतर सुविधा देण्याबाबतही महापालिका प्रशासन नेहमीच सकारात्मक राहिलेले आहे. समान काम, समान वेतन याबाबतही प्रशासनाची भूमिका ही कर्मचारी हिताय आहे. तथापि याविषयी कोणत्याही प्रकारे बाजू ऐकू न घेता वा सविस्तर चर्चा न करता आंदोलकांनी ज्या प्रकारे धुडगूस घातला ही बाब कार्यालयीन कामकाजात अडथळा आणणारी व कायदा सुव्यवस्था हातात घेणारी होती. त्यामुळे आंदोलकांविरोधात एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात फिर्यादही दाखल करण्यात आली आहे. तथापि असा प्रकार अचानक घडल्यामुळे पालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांचे मनोबल खच्ची होण्याचा संभव आहे, असे नमूद करत महापालिकेतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची मागणी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आलेली आहे.

हेही वाचा –

नाशिककरांनो, पुढील दोन दिवस मुसळधार

First Published on: September 13, 2021 7:06 PM
Exit mobile version