मोरबे धरण भरण्याचा वेग मंदावला; धरण ८५.७६ टक्के भरले

मोरबे धरण भरण्याचा वेग मंदावला; धरण ८५.७६ टक्के भरले

नवी मुंबईकंराची तहान भागविणारे मोरबे धरण ८५.७६ टक्के भरलेले आहे. सद्यस्थितीमध्ये धरणामध्ये १६०.७१२ दक्षलक्ष घनमीटर इतका साठा जमा आहे. पंधरा दिवसांपुर्वी धरणामध्ये असणार्‍या पाणी साठ्याइकाच साठा अजूनही आहे. धरणाच्या पातळीत वाढ न झाल्यामुळे मोरबे धरण भरण्याचा वेग मंदावला आहे. पाऊसांनी सद्यस्थितीत हुलकावणी दिल्यामुळे धरण भरण्याच्या पातळीचा वेग मंदवला आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र जून अखेर पासून पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यांनतर जुलै महिन्यांच्या अखेरच्या आवठ्यात संततधार सुरु असणार्‍या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली. पंधरा दिवसांपूर्वी धरण ८५ टक्के भरले होते. तर आताही धरणामध्ये तेवढेच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे धरणाची पातळी वाढवण्याचा वेग मंदावला होता. मोरबे धरण हे ८८ मीटरला पूर्ण क्षमतेने भरते. त्यानंतर विसर्ग केला जातो. पण सद्यस्थितीत धरणाची पातळी ही ८५.७६ मीटर इतकीच भरलेली आहे. धरणामध्ये १९०.८९ दक्षलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा होतो. पण सद्यस्थितीत धरणामध्ये १६३.७१२ दक्षलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. जो धरणाच्या क्षमतेच्या तुलनेत ८५.७६ टक्के इतकाच आहे. मोरबे धरण हे २०१८ मध्ये २५ जुलैला पूर्ण भरले होते. २०१९ ला ४ ऑगस्ट रोजी पूर्ण भरले होते. तर २०२० मध्ये धरण ९५ टक्के भरले होते. यंदादेखील धरणाची पातळी ही कमीच आहे.

सप्टेंबर महिना सुरु होण्यास सुरुवात झालेली असताना धरण पूर्ण क्षमेतेने भरलेले नाही. धरणातून प्रतिदिन ४४० एमएलडी पाणीपुरवठा नवी मुंबई सह कामोठे व मोरबे परिसरातील सात गावांनाही पाणीपुरवठा केला जात आहे. धरणातून पाणीपुरवठा सुरुळीत सुरु आहे. मात्र धरणात क्षेत्रात पाऊस नसल्याने गेल्या १५ दिवसात पातळी वााढलेली नाही. त्यामुळे यंदा धरणातून विसर्ग होण्याची शक्यता कमीच आहे.

हेही वाचा –

Dahi Handi 2021: दहीहंडी साजरी केल्यामुळे मुंबईत चार गुन्हे दाखल

First Published on: August 31, 2021 8:33 PM
Exit mobile version