सागरकन्या मंत्रा मंगेश कुरहेचा धरमतर ते गेटवे पोहण्याचा नवा विक्रम

सागरकन्या मंत्रा मंगेश कुरहेचा धरमतर ते गेटवे पोहण्याचा नवा विक्रम

कधी लाटांवर स्वार होत तर कधी विरुद्ध दिशेने येणाऱ्या आणि पोहताना मागे ढकलणाऱ्या लाटांशी दोन हात करत. तर कधी समुद्रातील जेलीफिशचा चावा सहन करत मंत्रा मंगेश कुरहे हिने पोहण्याचा नवा विक्रम केला आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील रहिवासी व वाशीच्या फादर आग्नेल हायस्कूलची इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या १२ वर्षीय मंत्रा कुरहे या सागरकन्येने घरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे ३८ किमी चे सागरी अंतर अवघ्या ७ तास आणि ५४ मिनिटांत पार केले आहे. याआधी हेच अंतर ८ तास १८ मिनिटांत पार करण्याचा विक्रम एका महिला जलतरणपटूच्या नावावर होता. जो मंत्राने मोडला आहे. २० मार्च रोजी रात्री ९ वाजून ९० मिनिटांनी मंत्राने धरमतरच्या खाडीत आरंभीचा सूर मारून पोहण्यास सुरुवात केळी. सकाळी ९ वाजून ४ मिनिटांनी तिने गेट वे ऑफ इंडियाच्या प्रवेशद्वार गाठले. हे ३४ किमीचे सागरी अंतर पार करताना मंत्राला अनेक अडचणीचा सामना करावा लागला.

कधी विरुद्ध दिशेने येणाऱ्या लाटांचा प्रवाह तिला मागे ढकलत होता. तर कधी समुद्रातील जेलीफिश तिला टोचून जात होता. मात्र या सर्वांना न घाबरता नेटाने तिने ७ तास आणि ५४ मिनिटांत हे अंतर पार केले. तिच्या या विक्रमामुळे नवी मुंबईच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. याआधी मंत्राने बरोबर एक वर्षापूर्वी २९ मार्च २०२१ रोजी एलिफंटा गेटवे ऑफ इंडिया हे सागरी अंतर २ तास ५१ मिनिटांत कापून मुलींमध्ये एक नवा विक्रम प्रस्थापित केला होता. ज्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. मंत्राला प्रशिक्षक गोकुळ कामत आणि अमित आवळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

हेही वाचा –

ही राक्षसी हुकूमशाहीची नांदी; उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावरील कारवाईवर संजय राऊत संतापले

First Published on: March 22, 2022 9:15 PM
Exit mobile version