ही राक्षसी हुकूमशाहीची नांदी; उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावरील कारवाईवर संजय राऊत संतापले

Sanjay Rauts big statement on tweet on government dismissal says I will not says mva government dismiss

अंमबजावणी संचालनालय अर्थात ईडीने (ED) आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हुणे श्रीधर पाटणकर यांच्या संपत्तीवर कारवाई केली. या कारवाईदरम्यान ईडीने श्रीधर पाटणकर यांची 6 कोटींपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे. पुष्पक बुलियन कंपनीशी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय तपासयंत्रणांच्या माध्यमातून अशा प्रकारे दबाव आणणं ही राक्षसी हुकूमशाहीची नांदी असल्याचे राऊत म्हणाले आहेत.

“श्रीधर पाटणकर हे आमच्या परिवारातील सदस्य आहेत. त्यांच्यावरील ही कारवाई फक्त राजकीय दबाव, सुडबुद्धी आणि कोणतीही बाजू मांडण्याची संधी न देता सनसनाटी निर्माण करण्यासाठी केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही झुकवू शकतो, नमवू शकतो हे राजकीय विरोधकांनादाखवण्यासाठी या प्रकारच्या कारवाया होत आहेत. अशाप्रकारच्या कारवाया फक्त महाराष्ट्रातचं नाहीत तर जिथे जिथे भाजपची सत्ता नाही अशा प्रत्येक राज्यात अशाप्रकारच्या कारवायांना उत आला आहे” असं संजय राऊत म्हणाले.

“पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा भाचा खासदार अभिषेक बॅनर्जी यांना काल दिल्लीत बोलवून त्यांची 8 तास चौकशी केली. त्यांची पत्नीलाही अशाप्रकारची नोटीस आली आहे. एखाद्या राज्यात निवडणुक हरलो म्हणून ज्यांनी आपली सत्ता खेचून घेण्यासाठी पराभव केला त्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून अशाप्रकारे दबाव आणणे, ही राक्षसी हुकुमशाहीची नांदी आहे. संसदेत काल ईडीच्या कारवाई संदर्भात जी माहिती आली त्यात सर्वाधिक कारवाया भाजपचे शासन नसलेल्या राज्यात झाल्या आहेत.” असा दावा देखील राऊत यांनी केला.

राऊत पुढे म्हणाले की, युपीएच्या 11 वर्षाच्या काळामध्ये फारतर 22 किंवा 23 कारवाया झाल्या, मात्र मोदींच्या शासनास 2500 आसपास कारवाया केल्या आहेत. अनेक कारवाया चुकीच्या पद्धतीने झाल्याचं कोर्टात स्पष्ट झालं आहे. मात्र, या सगळ्या यंत्रणा आता हुकुमशाहीसाठी काम करत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.


समृद्धी महामार्ग सप्टेंबरमध्ये प्रवासासाठी खुला होणार, एकनाथ शिंदेंची माहिती