मुंबई -अहमदाबाद महामार्गावर बायोडिझेलचा काळाबाजार

मुंबई -अहमदाबाद महामार्गावर बायोडिझेलचा काळाबाजार

सुमित पाटील,बोईसर: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेल्या एका ढाब्यावर इंधनाच्या काळ्याबाजाराचा प्रकार उघडकीस आला आहे. हा महामार्ग अशा प्रकारांमुळे पुन्हा एकदा प्रकाश झोतात आला आहे.चोरीचा माल लपवून ठेवल्याची गुप्त माहिती पालघर तहसीलदार सुनील शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार १.३० सुमारास अचानक धाड टाकून लिक्कीड , परफिन भरलेले २०० लिटरचे २५ पिंप (ड्रम) लोखंडी सळ्या असा चोरीचा माल पकडला आहे . सदरची कारवाई तहसीलदार सुनील शिंदे, मंडळ अधिकारी संदीप म्हात्रे, बोईसर मंडळ अधिकारी मनीष वर्तक , तलाठी संजय चुरी, नितीन
सुर्वे, हितेश राऊळ ,पुरवठा अधिकारी देवेंद्र पाटील, सरपंच पोलीस पाटील यांनी केली .यानंतर तहसीलदार यांनी याची माहिती मनोर पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेला दिली . तहसीलदारांनी धाड टाकताच अवैध धंदे करणारा किसन पळून गेला.

मुंबई -अहमदाबाद महामार्गालगतच्या ढाब्यावर अवैध धंदे सुरू करून मनोर पोलीस ठाणे हद्दीत नांदगाव , आवंढानि, चिल्हार , दुर्वेस , हालोली, कुडे, वाडा खडकोना , चिंचपाडा, मेंढवन , या गावाच्या हद्दीत बायोडीजेल, नाफ्ता, डांबर , सळई, विकण्याचे धंदे जोरात सुरू आहेत. पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अशा घटनांना कायमस्वरूपी आळा घालण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

First Published on: February 1, 2023 9:41 PM
Exit mobile version