अबब ! म्हशीच्या रेडूकाचा रंग पाहिलात का ?

अबब ! म्हशीच्या रेडूकाचा रंग पाहिलात का ?

मनोर : मुंबई- अहमदाबाद महामार्गालगतच्या टेन ग्रामपंचायत हद्दीतील टाकवहाल गावात शेतकरी समीर पटेल यांच्या म्हशीने शनिवारी चक्क पांढर्‍या शुभ्र रेडकाला जन्म दिला. म्हशीचा रंग काळा असल्याने तिने जन्मास घातलेले रेडकूही शक्यतो काळ्या रंगाचेच असते. परंतु समीर पटेल यांच्या म्हशीचे पांढरे शुभ्र रेडकू सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. पांढरे शुभ्र रेडकू परिसरात आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. त्याला पाहण्यासाठी पटेल यांच्या गोठ्यात गर्दी होत आहे. म्हशीच्या पोटी पांढरे शुभ्र पिल्लू जन्मास येणे ही दुर्मिळ घटना आहे. प्राण्याच्या शरीराचा रंग ठरवणार्‍या मेलानिनची कमतरता अनुवांशिक गुण- सूत्रांच्या अव्यवस्थेमुळे होते आणि याच रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे रेडकुच्या त्वचेचा, डोळे व केसांचा रंग पांढरा शुभ्र बनतो. याला अल्बीनिजम म्हटले जात अजून ही दुर्मिळ घटना आहे. ही घटना पटेल कुटुंबीयासाठी आश्चर्याची बाब असून शुभ्र रेडकाच्या जन्मामुळे पटेल कुटुंब आनंदात असून रेडकाची काळजी घेतली जात
आहे.

First Published on: October 3, 2022 10:35 PM
Exit mobile version