प्रामाणिक रिक्षाचालकाचे केला चौदा लाखांचा मुद्देमाल प्रवासाला परत

प्रामाणिक रिक्षाचालकाचे केला चौदा लाखांचा मुद्देमाल प्रवासाला परत

रिक्षात विसरून गेलेल्या एका महिला प्रवाशाची बॅग पोलिसांमार्फत परत करण्याचा प्रामाणिकपणा दाखवणार्‍या मीरा रोडमधील रिक्षाचालकाचे सर्व थरातून कौतुक केले जात आहे. त्या बॅगेत रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने मिळून तब्बल १४ लाख रुपयांचा ऐवज होता. इफ्तिखार अली नादीर खान असे प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव असून तो मीरा रोड परिसरातील रहिवाशी आहे. शनिवारी संध्याकाळी त्याने एका महिला प्रवाशाला मीरा रोडहून काशिमीरा येथे सोडले. परतताना पेट्रोल पंपावर गेला असता इफ्तिखार याला रिक्षाच्या मागील सीटवर महिला प्रवाशी बॅग विसरून गेल्याचे दिसून आले. बॅग काय आहे याची पाहणी न करता त्याने थेट मीरा रोड पोलीस ठाणे गाठले. त्याठिकाणी ही घटना काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने त्याला तिकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला. पण, न कंटाळता त्याने थेट काशिमीरा पोलीस ठाणे गाठले.

ज्यांची मालमत्ता होती ती त्यांना मिळाली त्याचा जास्त आनंद आहे. इस्लाम धर्मात चोरी गुन्हा आहे. जे आपल्याला कष्टातून मिळते त्याचा आनंद व समाधान वेगळे असते. म्हणून ती बॅग मी पोलीस चौकीत जमा केली.
– इफ्तिखार अली नादीर खान, रिक्षाचालक

पोलिसांनी बॅगेची तपासणी केली असता त्यात एक लाख रुपये रोख, सोन्या-चांदीचे दागिने आणि तीन मोबाईल असा सुमारे १४ लाखांचा मुद्देमाल आढळून आला. एका मोबाईलवरून त्यांनी संबंधीत व्यक्तीला संपर्क साधून पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. महिलेने बॅगेची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी ती तिच्या ताब्यात दिली. विशेष म्हणजे इफ्तिखारने कर्ज काढून रिक्षा विकत घेतली आहे. कोरोनाकाळात लॉकडाऊन असल्याने रिक्षा बंद होती. परिणामी त्याचे कर्जाचे हप्ते थकले होते. असे असतानाही कोणताही लोभ न करता त्याने बॅग पोलिसांना आणून दिल्याने त्याचे सर्व थरावरून कौतुक केले जात आहे. पोलिसांनीही प्रामाणिकपणा बद्दल त्याचा गौरव केला.

हेही वाचा –

कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता पोलिसांनी गुन्हेगारी मोडीत काढावी – अजित पवार

First Published on: February 5, 2021 8:28 PM
Exit mobile version