केळवे गावासाठी भरघोस निधी मंजूर

केळवे गावासाठी भरघोस निधी मंजूर

पालघर: पालघर तालुक्यातील केळवे या पर्यटन दर्जा प्राप्त गावाच्या विकासासाठी पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा यांच्या प्रयत्नातून तब्बल साडेआठ ते नऊ कोटी रुपयांचाचा विकास निधी मंजूर करण्यात आला असून त्यामध्ये प्रामुख्याने केळवे स्टेशन ते केळवे दांडा रस्ता (एमडीआर -34) साडे आठ किलोमीटर लांबीचा रस्ता सुमारे साडे पाच कोटी अठ्ठावन लाख रुपये किंमतीचा असून केंद्रीय राखीव निधीतून मंजूर झाला आहे. या रस्त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठ पुरावा केला होता. तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य पर्यटन विकास निधी अंतर्गत केळवे पुल नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (रुपये अडीच कोटी) आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शितला देवी मंदिर रस्ता (पन्नास लक्ष रुपये) मंजूर करून घेतले आहेत.

या विकास निधीतून कामे सुद्धा पूर्णत्व होत आहेत. तसेच हॉटेल मौज रस्ता (दहा लाख), धवांगे पाडा रस्ता (दहा लाख ,केळवे पोलीस स्टेशन रस्ता( पंधरा लाख) ही कामे राज्यशासनाच्या ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून आणि वर्तक पाखडीतील चंद्रकांत वर्तक यांच्या घराकडे जाणारा रस्ता (दहा लाख) हे कामे आमदार स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली आहे. काही कामे अंतिम टप्प्यात असून लवकरच पूर्ण होतील, काही कामे पूर्ण झाली आहेत. दरम्यान राज्य सरकारच्या पर्यटन विकास आणि इतर निधीतून मतदार संघात अनेक कामे झाली असून त्यांचे लोकार्पण करण्यात येईल. राज्य पर्यटन विकास निधीतून माहीम, शिरगाव, सातपाटी, चिंचणी, महालक्ष्मी या गावातील अनेक विकास कामे मंजुरीसाठी प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती आमदार श्रीनिवास वनगा यांनी दिली आहे.

First Published on: April 17, 2023 10:16 PM
Exit mobile version