मी ऐतिहासिक अर्नाळा,पण सोसतोय मरणकळा

मी ऐतिहासिक अर्नाळा,पण सोसतोय मरणकळा

मानसी कांबळे, वसई: वसई -विरार निसर्गाचे देणं म्हणून ओळखले जाते. हे शहर तीन बाजूने डोंगररांगा आणि एका बाजूने विस्तीर्ण समुद्र किनार्‍याने व्यापलेले आहे. वसई शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. नरवीर चिमाजी आप्पांची पावन भूमी आणि मिनी गोवा म्हणून ह्या वसई तालुक्याची ओळख आहे. याच वसई तालुक्यात विरार पश्चिमेला असलेल्या अर्नाळा समुद्र किनारी समस्या उद्भवत आहेत. पर्यटकांसाठी या समुद्र किनारी सुविधा नसल्याने आणि अपुर्‍या सेवा सुविधा असल्याने पर्यटकांनी या पर्यटनस्थळांकडे पाठ फिरवली आहे.
पर्यटनाच्या माध्यमातून अर्नाळा गावात मोठी रोजगार निर्मिती झाली असती पण ती सुद्धा अयशस्वी ठरली आहे. अर्नाळा समुद्र किनारी दरवर्षी हजारो पर्यटकांची वर्दळ असते. अनेक जण याला मिनी गोवा म्हणुन देखील ओळखतात. अर्नाळा समुद्रकिनारी जाताना सुरुवातीलाच पर्यटक कर वसूल केला जातो. मात्र पर्यटक कर घेतला जात असताना सुद्धा पर्यटकांना तशा सोयी सुविधा दिल्या जात नसल्याने पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे.

 

1) समुद्रकिनारी प्रवेश केल्यानंतर सर्वत्र कचर्‍याचे ढीग पडलेले असतात.त्यामुळे गावकर्‍यांसह पर्यटकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील आता ऐरणीवर .

2)सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, किफायतशीर जेवण व निवास व्यवस्था, सुरक्षितता या प्राथमिक सुविधांची कमतरता अर्नाळा समुद्र किनारी भासत असते.

3) पिण्याचे पाणी, उत्तम रस्ते, सुरक्षा यंत्रणा आणि माफक दरातील कँटीनची देखील साधी सोय नाही. काही ठिकाणी शौचालय बनवली खरी परंतु त्याची अस्वच्छता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

4) अर्नाळा समुद्र किनारी भटक्या कुत्र्यांनी मोठी दहशत निर्माण केली असून यामुळे पर्यटनावर देखील मोठा परिणाम झाला आहे.

कोट

आम्ही मागील कित्येक वर्षांपासून या अर्नाळा समुद्र किनारी मनसोक्त आनंद घेण्यासाठी येत असतो.मात्र या समुद्रकिनारी मागील कित्येक वर्षांपासून काही प्रलंबित समस्या अद्यापही जशास असून यामुळे पर्यटनावर मोठा परिणाम होत आहे.
– पर्यटक

First Published on: January 9, 2023 10:06 PM
Exit mobile version