मोखाड्यात आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानंतर कर्मचाऱ्यांनी मारली दांडी

मोखाड्यात आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानंतर कर्मचाऱ्यांनी मारली दांडी

मोखाडा तालुक्यातील सावर्डे येथील ओंडक्यावरचा जीवघेणा प्रवास होता, तो आता थांबला. त्यावर लोखंडी पूल ७५ दिवसात पूर्ण केला. ७५ वर्षांपासून ओंडक्यावरून लोकं ये-जा करत होते. परंतु ८ तारखेला रविवारी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हातून लोकार्पण झाले आणि लोकांचा प्रवास आता सुखकर झाला. परंतु त्या दौऱ्यामध्ये मोखाड्यातील कर्मचारी रविवारी सुट्टी असताना दौऱ्यात गेल्यामुळे सोमवार, ९ मे रोजी मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम, पंचायत समिती, वनपरिक्षेत्र, सामाजिक वनीकरण अशा सर्व कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अक्षरशः दांडी मारल्याचा आरोप होत आहे.त्यामुळे ग्रामस्थांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

सुट्टी नसताना कर्मचारी गैहजर राहणे वास्तविक पाहता चुकीचे आहे. याचा अर्थ असा की तुम्ही सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम करता, असे म्हणावे लागेल. गैरजर कर्मचाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
– मिलिंद झोले, जिल्हाध्यक्ष, आदिवासी आघाडी, भाजप

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुका हे शेवटचे टोक असून हा तालुका आदिवासी तालुका आहे. शासन आदिवासी विभाग असल्यामुळे अनेक प्रकारचे विकास, अनेक प्राकारच्या योजना या आदिवासी भागामध्ये राबतात. परंतु तालुक्यातील अधिकारी जर दौऱ्याच्या नावाखाली जर दुसऱ्या दिवशी सुट्टी घेत असतील, तर दौरे कशासाठी करायचे. या सर्व गोष्टीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेच जबाबदार असतील, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. आठवड्यातील पहिला दिवस हा कामकाजाचा असून या दिवशी येणारे-जाणारे नागरिक त्यांची कामे रखडून राहिली. त्या गोष्टीचा नागरिकांना प्रचंड त्रास झाला. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा दौरा रविवारी होता. तर शासनाने आधीच सोमवारची सुट्टी जाहीर करायला हवी होती.

शासन आणि लोकप्रतिनिधींनी सामान्य जनतेचा विचार करून त्यांच्यासाठी काय सोईस्कर आहे ते लक्षात घेऊन काम करणे गरजेचे आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंच्या रविवार दौऱ्याने सोमवारी पहिला दिवशी अधिकाऱ्यांनी सुट्टी घेऊन नागरिकांना त्रास दिल्याचे काम केले आहे. शासकीय सुट्टी नसताना रजा घेऊन शासनाचे नियम धाब्यावर बसवले.
– विठ्ठल चोथे, तालुका अध्यक्ष, भाजप

बुलेट्स म्हणून घ्या 

हेही वाचा –

राजद्रोहाच्या कलमाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

First Published on: May 11, 2022 3:43 PM
Exit mobile version