पावसाळ्यात नाल्याचे तोंड उघडणार; कांदळवन परिसरात आरोग्य विभागाची पाहणी

पावसाळ्यात नाल्याचे तोंड उघडणार; कांदळवन परिसरात आरोग्य विभागाची पाहणी

मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील नाले सफाई ८५ टक्के पूर्ण झाली असली तरीही कांदळवन परिसरात मुख्य नाले व खाड्यांच्या तोंडाला जमा होत असलेला कचरा व कांदळवनाची सुकलेली झाडे बाजूला सारून पाण्याचा निचरा करण्यासाठी कांदळवन विभागाच्या अधिकार्‍यांच्यासोबत पालिका अधिकारी यांनी शहरात पाहणी दौरा केला. महापालिका हद्दीतील ज्याठिकाणी नालेसफाई होत नाही, अशा ठिकाणी जेटिंग मशीनच्या साहाय्याने खोदकाम केले आहे. त्यात एकूण सात ठिकाणी कलव्हर्ट काशिमिरा महामार्गाच्या ठिकाणी ३ आणि रेल्वे धावपट्टीच्या खाली अंडर ग्राउंड चार असे आहेत. त्याठिकाणी जेटी मशीनच्या साहाय्याने खोदकाम केले आहे. तसेच भाईंदर पश्चिमेचे पाणी दरवर्षी मिरारोड, शांती नगर भागात जाते त्यांना तिकडे न-जाऊ देता थेट कच्चे नाले खोदून मोकळ्या जागेतील पाणी थेट खाडीशी जोडन्यात येणार आहे.

मिरा भाईंदर शहरातील गुरुवारी हिंदू स्मशान भूमी, वर्सोवा हायवे ते उघाडी, जाफरी खाडी ते मिरारोड, मुर्धा खाडी, अदानी पावर हाउस, कनकिया येथील लल्लन तिवारी कॉलेज समोरील खाडी, पूनम सागर ते जाफरी खाडी, इंद्रलोक उघाडी, रामवाटिका खाडी, बजरंग नगर, शास्त्री नगर, शिमला गल्ली, गणेश देवल नगर, घोडबंदर उघाडी व नाझरेथ आगार ते जाफरी खाडी या १४ ठिकाणी पाहणी करण्यात आली असून सर्व नाल्यांच्या तोंडावर जंगली झाडे व कांदळवणाची झाडे बाधा ठरणारी यांच्यावर तोडगा काढण्यासाठी पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यात येत्या दोन दिवसात कांदळवन विभाग निर्णय घेणार असून त्यात कुठल्याच झाडांना बाधा न-पोहोचता मॅन्युअली किंवा कश्याप्रकारे काढता येईल, हे नक्की होणार आहे.

सदरील पाहणी दौर्‍यात महापौर ज्योत्स्ना हसनाळे, पालिका आयुक्त दिलीप ढोले, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे व उपायुक्त रवी पवार, सोबत कांदळवन सेल विभागाचे सचिन मोरे, ज्ञानेश्वर मस्के व संबंधित विभागाचे स्वच्छता निरीक्षक हे उपस्थित होते.

हेही वाचा –

राणा दाम्पत्यामुळे ‘त्या’ इमारतीमधील ८ रहिवाशांनाही पालिकेची नोटीस

First Published on: May 27, 2022 9:07 PM
Exit mobile version