डहाणूतील 60 उपसरपंच पदांची निवड 27 आणि 28 ऑक्टोबरला होणार

डहाणूतील 60 उपसरपंच पदांची निवड 27 आणि 28 ऑक्टोबरला होणार

डहाणू : डहाणू तालुक्यातील अनुसूचित क्षेत्र आणि पेसा अंतर्गत असणार्‍या 61 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 16 ऑक्टोबर रोजी पार पडल्या होत्या. यावेळी थेट सरपंच आणि सदस्य निवडले गेले होते. मात्र, उपसरपंच पदाची निवडणूक बाकी असून, त्यात डहाणू तालुक्यातील 61 ग्रामपंचायतच्या उपसरपंचाचा समावेश आहे. आता या उपसरपंचपदाच्या निवडणुका 27 आणि 28 ऑक्टोबर २०२२ रोजी घेतल्या जाणार आहेत. या उपसरपंचपदाची निवड निवडून आलेल्या सदस्यामधून बहुमताने केली जाणार आहे. उपसरपंचांची निवडणूक घेण्यासाठी अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. उपसरपंच पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करून घेणे, नामनिर्देशन पत्राची छाननी करणे, तसेच उमेदवारी अर्ज मागे घेणे याबाबतची संपूर्ण प्रक्रिया अध्यासी अधिकारी यांनी पार पाडावयाची आहे. या उपसरपंच पदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सकाळी अकरा वाजल्या पासून सुरू होणार आहे.
डहाणू तालुक्यात 27 ऑक्टोबर रोजी अस्वाली, चिंबावे,चिखले,नागझरी,कंक्राडी नंदारे,डेहणे पळे, आगवन,आसवे,अशागड,बावडे,वाढवण,तणाशी, सारणी, रणकोळ, निकणे, गंजाड,विवळवेढे, दह्याळे, वाघाडी, बापूगाव, सायवन, चळणी, आंबोली, सास्वंद तलोटे, धामणगाव, कासा, रायपूर, तवा, हळदपाडा, तर 28 ऑक्टोबर रोजी, घोलवड, रामपूर, नरपड, कैनाड, वाकी, साखरे, सरावली, चरीकोटबी, जामशेत, कोलवली देदाळे,वणई चंद्रनगर, वरोर, वासगाव, आसनगाव, वाणगाव, रानशेत, उर्से, रायतळी, धानिवरी, ओसरविरा, धरमपूर, शेणसरी, निंबापूर, बांधघर,दिवशी, शिसणे, चिंचले, बहारे, वेतीवरोती, शिलोंडा, मुरबाड, धुंदलवाडी या 60 ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुका होणार आहेत.

First Published on: October 25, 2022 9:22 PM
Exit mobile version