जव्हार अर्बन बँक निवडणुकीत शिवनेरी पॅनलचा जोरदार प्रचार

जव्हार अर्बन बँक निवडणुकीत शिवनेरी पॅनलचा जोरदार प्रचार

मोखाडा : दि जव्हार अर्बन को ऑपरेटिव्ह बँक. लि.जव्हार या बँकेच्या संचालक मंडळाची पण वार्षिक निवडणूक रविवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी होत आहे.या निवडणुकीत शिवनेरी पॅनलने शिवसेना,भाजप,राष्ट्रवादी,सीपीएम पुरस्कृत,उमेदवारांनी  युती केली असून जव्हार,मोखाडा,वाडा,विक्रमगड,तालुक्यासह मनोर भागातही प्रचाराला सुरूवात केली आहे.शिवनेरी पॅनलचे सर्वच उमेदवार प्रभावी असल्याचा दावा केला जात आहे.

मोखाडा व खोडाळा आणि पंचक्रोशीत आज या सर्वच उमेदवारांनी मतदारांच्या भेटी घेण्यासाठी उत्स्फूर्त रॅली काढून मतदारांचा कौल शिवनेरी पॅनलकडे झुकविण्याचा यशस्वी प्रयत्न केला असल्याचे दिसून आले.शिवनेरी पॅनलकडून प्रथितयश व्यावसायिक व उच्चविद्या विभूषित उमेदवारांचा भरणा असल्याचा पॅनलचा दावा आहे. शिवनेरी पॅनलकडून सर्व साधारण गटासाठी छत्री ही निशाणी घेऊन आळशी सागर विजय,भानुशाली मनोज विठ्ठल, चोथे हितेंद्र जयराम, चोथे (कोठेकर) प्रमोद माधव,घाची अश्रफ सुलेमानी,कोतवाल अरशद कासम,खंदारे वासुदेव त्र्यंबक,मणियार रियाज युसुफ,पाटील भालचंद्र भास्कर, उदावंत कुणाल प्रदीप, उदावंत राजेंद्र पुंजिराम, डॉ. सदगीर विठ्ठल दामोधर हे 12 उमेदवार सर्वसाधारण गटातून तर भटक्या विमुक्त जाती -जमाती व विशेष मागास प्रवर्गातील संतोष एकनाथ चोथे यांच्यासह सटानेकर सचिन अशोक हे इतर मागासवर्गीय व अ‍ॅडव्होकेट भोईर प्रसन्न वसंत हे अनुसुचीत जाती-जमाती तसेच महिला राखीव गटातून आहीरे शलाका शिवाजीराव,वानी मनीषा बाळकृष्ण हे 17 उमेदवार छत्री निशाणी घेऊन शिवनेरी पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवीत आहेत.

या सर्वच उमेदवारांचा विजयाचा दावा असला तरी निलेश सांबरे यांच्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटनेनेही जव्हार अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी 17 ही प्रभागामधून आपले 17 उमेदवार उभे करून शिवनेरी पॅनलसमोर कडवे आव्हान उभे केले आहे.त्यामुळे जव्हार अर्बन बँकेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार असून  शिवनेरी पॅनलने ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला असला तरी  निवडणूक निकाल पाहणे मतदारांसाठी औचित्याचे ठरणार आहे.

First Published on: November 4, 2022 8:05 PM
Exit mobile version