बीडमधील सावरकर गौरव यात्रेत ‘मुंडे भगिनीं’ची अनुपस्थिती; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

बीडमधील सावरकर गौरव यात्रेत ‘मुंडे भगिनीं’ची अनुपस्थिती; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pankaja Munde, Pritam Munde absent in Beed Savarakar Gaurav yhatra

भाजपच्या सावरकर गौरव यात्रेला बीडमध्ये सुरुवात झाली आहे. मात्र, या यात्रेला बीडमधील प्रमुख नेत्या पंकडा मुंडे आणि प्रितम मुंडे या  उपस्थित नव्हत्या. त्यामुळे मुंडे भगिनींच्या अनुपस्थितिमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

भारतीय जनता पार्टी-शिवसेनेच्या वतीने सावरकर गौरव यात्रा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडली. या यात्रेला जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात स्थानिक नेते मंडळींची उपस्थिती होती. मात्र, पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या दोघी मुंडे भगिनी गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुंडे भगिनींनी यात्रेला हजेरी का लावली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. Absence of Munde Sisters Pankaja Munde Pritam Munde in Savarkar Gaurav Yatra in Beed BJP

जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जल्लोष करत वाजत-गाजत, फटाक्यांच्या आतिषबाजी करत निघालेल्या मोटार सायकल रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. कार्यकर्त्यांनी गळ्यात गमचा आणि डोक्यावर मी पण सावरकर लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या.

भाजपच्या बड्या नेत्यांची उपस्थिती 

बीडमधील सावरकर गौरव यात्रेला भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील आले होते. यावेळी जाहीर कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडे गैरहजर होत्या. दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या संघटनेच्यावतीने व्यवसमुक्ती रॅलीचे आयोजन केले होते. याआधी जेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे औरंगाबाद दौऱ्यावर होते त्यावेळी पंकजा मुंडे यांचे निमंत्रण पत्रिकेतून नाव वगळण्यात आले होते.

( हेही वाचा: आव्हाडांनी कौतुक केलेल्या ‘त्या’ तरुणाला अटक, ट्वीट करत व्यक्त केला संताप; काय आहे प्रकरण? )

मुंडे भगिनींच्या अनुपस्थितिचे कारण काय? 

खासदार प्रितम मुंडे या संसदेच्या अधिवेशनामुळे दिल्लीत होत्या. तर पंकजा मुंडे भाजपाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी मुंबईत व्यग्र होत्या. त्यामुळे या मुंडे भगिनी सावरकर गौरव यात्रेला उपस्थित राहू शकल्या नाहीत. परंतु, कारण समोर आल्यानंतरही त्यांच्या अनुपस्थितीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

( हेही वाचा: खासदार नवनीत राणा यांचा जन्मदिवस नेमका कधी? तीन तारखा आल्या समोर! )

First Published on: April 6, 2023 5:33 PM
Exit mobile version