संयोगिता राजे छत्रपतींच्या आरोपांनंतर आता काळाराम मंदिरातील पुजारी घेणार शाहू महाराजांची भेट

संयोगिता राजे छत्रपतींच्या आरोपांनंतर आता काळाराम मंदिरातील पुजारी घेणार शाहू महाराजांची भेट

chhatrapati Sambhaji Raje

छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी संयोगिता राजे छत्रपती यांनी पंचवटी येथील प्रसिद्ध काळाराम मंदिरात वेदोक्त पद्धतीने मंत्र म्हणण्यास पुजाऱ्यांनी मज्जाव केल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणात गाजत आहे. आता या सगळ्या वादानंतर काळाराम मंदिरातील संबंधित पुजारी हे संभाजीराजे छत्रपती यांचे वडील छत्रपती शाहू महाराज यांच्या भेटीला जाणार आहेत.

नेमकं प्रकरण काय?

देशभरात गुरुवारी रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर संयोगिताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली, परंतु यावेळी महंतांनी ही पूजा पुराणोक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली. याला संयोगिताराजे छत्रपती यांनी विरोध दर्शवला आणि वैदिक पद्धतीने मंत्र म्हणण्यास सांगितले. हा सगळा प्रकार संयोगिता राजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितला.

काही दिवसांपूर्वी काळाराम मंदिरात पूजा करताना मंदिरातील तथाकथित महंतांनी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. मात्र, छत्रपती शाहू महाराज यांच्या घराण्यातील असल्याने मी त्यास विरोध दर्शवला. मात्र, वेदोक्त मंत्र म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाही, असे महंतांनी सांगितले, अशा आशयाची सोशल मीडिया पोस्ट संयोगिता राजे यांनी शेअर केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

( हेही वाचा: काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांचा मज्जाव; संयोगीताराजेचा पोस्टद्वारे आरोप )

संबंधित पुजाऱ्याचे म्हणणे काय?

संयोगिता राजे छत्रपती यांच्याशी वाद झालेल्या पुजाऱ्याचे नाव महंत सुधीरदास असे आहे. त्यांनी संयोगिता राजे छत्रपती यांच्यासोबतच्या वादावर भाष्य केले आहे. हा प्रकरा गैरसमजातून झाल्याची शक्यता महंत सुधीरदास यांनी वर्तवली. तसेच, या सगळ्या प्रकारामुळे छत्रपती घराण्याचा अपमान होत असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो, असे ते म्हणाले. महंत सुधीरदास लवकरच कोल्हापूरचे थोरले शाहू महाराज यांची भेट घेणार आहेत.

( हेही वाचा: श्रीकांत शिंदेंच्या नोकरांना सुरक्षा; मग संजय राऊतांना का नाही? सुनिल राऊतांचा सवाल )

First Published on: April 1, 2023 3:34 PM
Exit mobile version